शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

तिरोड्यात राष्ट्रवादीचा रास्ता रोको

By admin | Updated: April 28, 2017 01:45 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तिरोडाच्या वतीने गोंदिया मार्गावरील चंद्रभागा नाका येथे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह

नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती : शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व विविध मागण्या तिरोडा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तिरोडाच्या वतीने गोंदिया मार्गावरील चंद्रभागा नाका येथे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी गुरूवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. माजी आ.राजेंद्र जैन, दिलीप बन्सोड, नरेश माहेश्वरी यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते. याप्रसंगी शेतकरी कसा लुबाडला जात आहे, हे सरकार शेतकऱ्यांचे मित्र नसून शत्रू आहेत. शेतकऱ्यांना विविध प्रकारे नाडवल्या जात आहे अशा प्रकारचे मार्गदर्शन दिलीप बन्सोड, प्रेम रहांगडाले, डॉ.अविनाश जायस्वाल, जि.प. सदस्य कैलाश पटले यांनी केले. याप्रसंगी राजेंद्र जैन, नरेश माहेश्वरी यांनीही सरकारवर कडाडून हल्ला चढविला. यावेळी पं.स. सदस्य निता रहांगडाले, भरत मलेवार, डोमळे, न.प. सभापती नरेश कुंभारे, न.प. सदस्य अजय गौर, शिशुपाल पटले, हितेंद्र जांभुळकर, शिशुपाल पटले, विलास मेश्राम, संजय चंद्रीकापुरे, पंचायत समिती सभापती उषा किंदरले, उपसभापती किशोर पारधी, नितेश खोब्रागडे, पंचम बिसेन, गुड्डू कटरे, हेमंत हट्टेवार, संजय किंदरले, रामकुमार असाटी, जि.प. सदस्या सुनिता मडावी, माजी न.प. उपाध्यक्षा ममता बैस, जि.प. सदस्य राजलक्ष्मी तुरकर, पं.स. सदस्या जया धावडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. या आंदोलनप्रसंगी आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमाचे संचालन जागेश निमजे यांनी केले. शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे या भावनेने तालुक्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक, शेतकरी बांधव आले होते. या आंदोलनामुळे काही काळ गोंदिया तिरोडा मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. हे आंदोलन शांततामय मार्गाने करण्यात आले. यावेळी पोलीस बंदोबस्त चोख होता (तालुका प्रतिनिधी)