ईव्हीएम मशीनमध्ये घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 23:43 IST2017-11-01T23:43:20+5:302017-11-01T23:43:31+5:30
गोरेगाव तालुक्यातील मोहाडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत ईव्हीएम मशिनमध्ये घोळ करुन सरपंच पदाच्या उमेदवाराला विजयी करण्यात आल्याचा आरोप आहे.

ईव्हीएम मशीनमध्ये घोळ
लोकमत न्यूज नेटवर्क
निंबा (तेढा) : गोरेगाव तालुक्यातील मोहाडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत ईव्हीएम मशिनमध्ये घोळ करुन सरपंच पदाच्या उमेदवाराला विजयी करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे निवडणूक रद्द करुन पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी गावकºयांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
जिल्ह्यात १६ आॅक्टोबरला ग्रामपंचायत निवडणूक घेण्यात आली. यात गोरेगाव तालुक्यातील मोहाडी या गावाचा सुध्दा समावेश होता.
दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या पक्षापेक्षा पराभव झालेल्या पक्षाचे संख्याबळ अधिक होते.
यानंतरही त्यांचा पराभव झाला. निवडणुकीत वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशिनमध्ये सरपंचपदासाठी उभ्या असलेल्या उमेदवाराच्या नातेवाईकांनी ईव्हीएम मशिनमध्ये घोळ करुन आपल्या नातेवाईला निवडून आणल्याचा आरोप गावकºयांनी निवेदनातून केला आहे. त्यामुळे येथील ईव्हीएम मशिनची पुन्हा तपासणी करण्याची मागणी गावकºयांनी केली आहे.
तसेच येथील निवडणूक रद्द करुन नव्याने निवडणूक घेण्याची मागणी जिल्हाधिकारी काळे यांना निवेदनातून काही गावकºयांनी केली आहे. दिलेल्या निवेदनात ४१३ गावकºयांच्या स्वाक्षºया आहेत.
जिल्हाधिकाºयांनी यावर त्वरित योग्य कारवाई न केल्यास उपोषणावर बसण्याचा इशारा गावकºयांनी दिला आहे.