पॉझिटिव्ह रूग्णामुळे सिलेझरीत खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:00 IST2020-06-01T05:00:00+5:302020-06-01T05:00:46+5:30

सिलेझरी येथील २० वर्षीय तरूण तालुक्यातील अन्य मित्रांसबोत कामानिमित्त काही महिन्यांपूर्वी मुंबईला गेला होता. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे तो आपल्या मित्रांसह मुंबई ग्रीन कॉटन येथून १५ मे रोजी गावात आला. गावात येताच तो घरी गेला व आई-वडिलांसोबत राहू लागला.

Stimulation in the ciliary due to positive patient | पॉझिटिव्ह रूग्णामुळे सिलेझरीत खळबळ

पॉझिटिव्ह रूग्णामुळे सिलेझरीत खळबळ

ठळक मुद्देअख्खे गाव दहशतीत : गावात उडाला विलगीकरणाचा फज्जा, संबंधिताचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : जवळील ग्राम सिलेझरी येथील २० वर्षीय तरूण कोरोना बाधित आढळून आल्याने अख्ख्या गावात कमालीची दहशत निर्माण झाली आहे. मुंबईहून आलेला तो तरूण संस्थात्मक विलगीकरणात न राहता गृह अलगीकरणात राहत होता अशी माहिती आहे. घरात असताना परिसरात अनेकांशी त्याचा संपर्क आल्याची माहिती गावातून हाती लागली. गावातील एका जबाबदार लोकप्रतिनिधीच्या अट्टाहासापायी सिलेझरी येथील संस्थात्मक विलगीकरणाचा फज्जा उडाल्याची गावात चर्चा आहे. गुरूवारी (दि.२८) रात्री त्या युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावात एकच खळबळ माजली.
सिलेझरी येथील २० वर्षीय तरूण तालुक्यातील अन्य मित्रांसबोत कामानिमित्त काही महिन्यांपूर्वी मुंबईला गेला होता. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे तो आपल्या मित्रांसह मुंबई ग्रीन कॉटन येथून १५ मे रोजी गावात आला. गावात येताच तो घरी गेला व आई-वडिलांसोबत राहू लागला. त्याला गावातील संस्थात्मक विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले नाही अशी गावातून माहिती मिळाली. १५ मे पासून घराजवळील परिसरात व सार्वजनिक बैठकीवर सुद्धा त्याचे बसणे-उठणे सुरू होते. सदर युवक गडचिरोली आणि गोंदिया येथील कोरोना बाधित रूग्णांच्या संपर्कात आले असल्याचे कळल्याने त्याला अर्जुनी-मोरगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये बुधवारी (दि.२७) दाखल करण्यात करून स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. तपासणी अहवाल गुरूवारी रात्री उशीरा प्राप्त झाला व त्यात तो कोरोना बाधित असल्याचे सिद्ध झाल्याने गावासह परिसरात कमालीची खळबळ माजून अख्खा परिसर दहशतीखाली दिसत आहे.

प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषीत
सिलेझरीत रूग्ण निघताच कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता मार्गदर्शक तत्वानुसार उपविभागीय अधिकारी सिल्पा सोनाले यांनी परिसर कंटेन्मेंट झोन घोषीत केला. कोअर झोनमध्ये सिलेझरी गावाचा समावेश करण्यात आला. तसेच गावाजवळील विहिरगाव, येरंडी, घुसोबाटोला, डोंगरगावचा बफर झोनमध्ये समावेश करून दोन्ही झोन मधील गावे कंटोनमेंट क्षेत्रात टाकले. सदर प्रतिबंधित क्षेत्रामध्ये येणारे व जाणारे सर्व मार्ग तात्काळ प्रभावाने बंद करण्यात आले. सदर भागातील नागरिकांना प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर जाण्यास व प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील नागरिकांना सदर क्षेत्रात येण्यास पुर्णत: प्रतिबंध करण्यात आला आहे.


त्या लोकप्रतिनिधीचा अट्टाहास नडला
सिलेझरी येथील एका लोकप्रतिनिधीच्या अट्टाहासापायी संस्थात्मक क्वारंटाईनचा फज्जा उडाल्याची गावात खमंग चर्चा आहे. गावातील जिल्हा परि,द वरिष्ठ प्राथमिक शाळेत विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले होते व बाहेरून आलेले येथेच राहत होते. अशातच गावातील एका राजकीय पक्षाचे नेते समजणारे तसेच लोकप्रतिनिधीचे जवाबदार पद सांभाळणाऱ्या महाशयाची दोन मुले, एक सुन, एक नात शहरातून ८ मे रोजी गावात आले. आम्ही सर्व तपासन्या करून आलो आम्ही बाधित नाही असा अट्टाहास करून शाळेतील विलगीकरण कक्षात न राहता गावात मध्यभागी असलेल्या घरी ते राहु लागले. ते स्वत:च्या घरात राहू शकतात तर आम्ही का? नाही असे बोलून काहींनी घर गाठले व येथूनच गावात क्वारंटाईनचा फज्जा उडाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.


अनेकांच्या संपर्कात
तो तरूण अनेकांच्या संपर्कात आल्याची ओरड गावात आहे. आई-वडिलांसोबत एकाच घरात राहत असल्याने त्यांचा संबंध नित्यनेम आला. आई रोहयो कामावर सुद्धा जात होती. तर वडील कामानिमित्त परिसरातील एका गावात सातत्याने जात असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Web Title: Stimulation in the ciliary due to positive patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.