तालुक्यात सहा केंद्र सुरु करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 05:00 AM2019-11-12T05:00:00+5:302019-11-12T05:00:04+5:30

तालुक्यात २० हजार ६०० हेआर धानाची लागवड करण्यात आली तसेच सडक-अर्जुनी तालुक्यात १९ हजार ३८८ हक्टर आर लागवडीकरीता १८ धान खरेदी कार्यान्वित आहेत. परंतु आमगाव तालुक्यात धान पिकाची लागवड जात असून सुद्धा फक्त तीन सहकारी शेतकी धान खरेदी विक्रीचे केंद्र शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत.

Start six centers in the taluka | तालुक्यात सहा केंद्र सुरु करा

तालुक्यात सहा केंद्र सुरु करा

Next
ठळक मुद्देजि.प.स्थायी समितीचा ठराव : जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला ठराव

लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : तालुक्यात २० हजार ६२७ हेक्टर आर धानाची लागवड होत असून सुद्धा फक्त तीन धान खरेदी केंद्र कार्यान्वित आहेत. यामुळे शेतकऱ्यांना व्यापाºयांकडे धान विकावा लागत आहे. करिता १ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सहा केंद्र मंजुरीबाबत ठराव घेण्यात आला.
आमगाव तालुक्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक प्रमाणात आहे. तालुक्यात २० हजार ६०० हेआर धानाची लागवड करण्यात आली तसेच सडक-अर्जुनी तालुक्यात १९ हजार ३८८ हक्टर आर लागवडीकरीता १८ धान खरेदी कार्यान्वित आहेत. परंतु आमगाव तालुक्यात धान पिकाची लागवड जात असून सुद्धा फक्त तीन सहकारी शेतकी धान खरेदी विक्रीचे केंद्र शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना दरवर्षी गावातील व्यापाऱ्यांना अल्पदरात धान विक्री करावी लागत आहे. करीता तालुक्यात सहा धान खरेदी केंद्र आमगाव, गोरठा, कालीमाटी, कट्टीपार, तिगाव, अंजोरा या ठिकाणी सुरु करण्यात यावे. सदर ठिकाणी मोठे गोदाम उपलब्ध असल्याचे कारण सांगून ग्रामीण भागात धान खरेदी केंद्र सुरु करता येत नाही ही बाब योग्य नसल्याचे समितीचे सदस्य सुरेश हर्षे यांनी सांगीतले.
तसेच पुढे गोदाम लहान स्वरुपाचे असल्यावर महामंडळाने धान केंद्रावरुन वेळेच्या वेळी धानाची वाहतूक करण्याची सोय करावी किंवा वर्गकाटांचे मोजणी करुन धान खरेदी केंद्राला नोंद घेवून सरळ महामंडळाला धान जमा करावे किंवा आदिवासी संस्थेप्रमाणे मोकळ्या जागेवर धान खरेदी करण्याच्या मंजुरीचे शासनास सादर करावे. मंजुरी प्राप्त होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करावी असेही हर्षे, गंगाधर परशुरामकर यांनी सभागृहाला सुचविले.
यावेळी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी यांनी ठराव पारित करुन जिल्हाधिकाºयांना पाठविण्यात आला. सभेत जि.प.सदस्य हर्षे यांच्या मुद्दयांना समितीचे सदस्य गंगाधर परशुरामकर, पी.जी.कटरे यांनी सहकार्य केले.

शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची लाट
आमगाव तालुक्यात तीन खरेदी केंद्र उपलब्ध आहेत. पण सदर केंद्र आमगाव येथे असल्याने शेतकºयांना २० ते २५ किमी. पर्यंत धान विक्रीस आणण्यास मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे. यावेळी त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याकरीता शासन व खरेदी विक्री संस्थेच्या संचालकांनी धान खरेदी केंद्र वाढवून केंद्रस्तरावर धान खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी बैठकीत केली आहे.

Web Title: Start six centers in the taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी