ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:15 IST2021-01-13T05:15:56+5:302021-01-13T05:15:56+5:30
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षणाचे तीनतेरा वाजले आहेत. विद्यार्थी मोकाट झाले आहेत. यासंदर्भात कितीतरी पालकांच्या तक्रारी ...

ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा सुरू करा
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षणाचे तीनतेरा वाजले आहेत. विद्यार्थी मोकाट झाले आहेत. यासंदर्भात कितीतरी पालकांच्या तक्रारी आहेत. गुरुजी शाळा सुरू करा हो, असा टाहो फोडताना पालक दिसतात. विद्यार्थी, शिक्षकांचे कोरोना लसीकरण केव्हा होणार याकडे शिक्षकांचे लक्ष लागून आहे. ग्रामीण भागातील १ ली ते ८ वी चे प्राथमिक शाळेतील विद्यार्थी सर शाळा सुरू करा असा आग्रह धरताना दिसत आहेत. अर्ध्यापेक्षा अधिक सत्र निघून गेले. चाचणी व प्रथम सत्र परीक्षा झालीच नाही. प्राथमिक शाळेचा मुहूर्त सापडलाच नाही. सरकारने यावर योग्य विचार करावा आणि ग्रामीण भागातील १ ली ते ८ वी च्या शाळा लवकर सुरू कराव्यात, अशी मागणी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस ओमप्रकाश वासनिक यांनी केली आहे.