गोंदिया विमानतळावरून हवाई वाहतूक सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:44 IST2021-02-05T07:44:07+5:302021-02-05T07:44:07+5:30

गोंदिया : तालुक्यातील बिरसी विमानतळ येथून सरकारी विमान कंपनी एअर इंडियाने ‘उडान’अंतर्गत हवाई वाहतूक तातडीने सुरू करावी. सध्या नागपूरवरून ...

Start air transport from Gondia Airport | गोंदिया विमानतळावरून हवाई वाहतूक सुरू करा

गोंदिया विमानतळावरून हवाई वाहतूक सुरू करा

गोंदिया : तालुक्यातील बिरसी विमानतळ येथून सरकारी विमान कंपनी एअर इंडियाने ‘उडान’अंतर्गत हवाई वाहतूक तातडीने सुरू करावी. सध्या नागपूरवरून दिल्लीसाठी एकच विमान उड्डाण होत आहे. प्रवाशांची वाढीव संख्या लक्षात घेता त्यातही लवकरात लवकर वाढ करावी, अशी मागणी खासदार व वाहतूकविषयक संसदीय समितीचे सदस्य सुनील मेंढे यांनी एअर इंडियाचे चेअरमन आणि एमडी राजीव बंसल यांची बुधवारी भेट घेऊन केली.

खासगी विमान वाहतूक कंपन्या जास्त प्रमाणात नागपूर-दिल्ली प्रवास सुविधा देत असताना एअर इंडियानेदेखील या मार्गावर आपली उड्डाणे वाढविली पाहिजेत, अशी प्रवाशांची बऱ्याच दिवसांची मागणी आहे. सध्या नागपूरसह आसपासच्या बऱ्याच प्रवाशांना आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यासाठी मुंबई, पुण्याला जावे लागते. नागपूरसारख्या मोठ्या शहरातून असलेली आंतरराष्ट्रीय विमानसेवेची मोठी गरज लक्षात घेऊन सध्या अशा प्रकारची कुठलीही सेवा न देणाऱ्या एअर इंडियाद्वारे तातडीने याचे नियोजन करावे, अशी मागणीदेखील मेंढे यांनी केली. कोरोना काळात ‘वंदे भारत’अंतर्गत विदेशात अडकलेल्या असंख्य भारतीयांना सुखरूप परत आणण्याची अवघड कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल मेंढे यांनी एअर इंडियाचे कौतुक केले.

Web Title: Start air transport from Gondia Airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.