SSC Result 2020; गोंदिया जिल्ह्यात सौंदडची ट्विंकल उके जिल्ह्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 17:31 IST2020-07-29T17:31:02+5:302020-07-29T17:31:27+5:30

सौंदड येथील आर.जे.लोहिया विद्यालयाची ट्विंकल संजय उके हिने ९८.४० टक्के गुण घेवून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

SSC Result 2020; Saundad's Twinkle in Gondia district tops Uke district | SSC Result 2020; गोंदिया जिल्ह्यात सौंदडची ट्विंकल उके जिल्ह्यात अव्वल

SSC Result 2020; गोंदिया जिल्ह्यात सौंदडची ट्विंकल उके जिल्ह्यात अव्वल


लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बुधवारी (दि.२९) दहावीचा निकाल जाहीर केला. यात सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील आर.जे.लोहिया विद्यालयाची ट्विंकल संजय उके हिने ९८.४० टक्के गुण घेवून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर व्दितीय आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड चुरस दिसून आली. गोंदिया जिल्ह्याचा एकूण निकाल ९४.७० टक्के लागला असून नागपूर विभागात गोंदिया अव्वल आहे. मागील तीन वर्षांपासून दहावीच्या निकालात विभागात अव्वल राहण्याची पंरपरा गोंदिया जिल्ह्याने यंदा सुध्दा कायम ठेवली आहे. दहावीच्या परीक्षेला जिल्ह्यातील एकूण २० हजार ५२९ विद्यार्थी बसले होते.यापैकी १९ हजार ५४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.विशेष प्राविण्यामध्ये ६ हजार ३७१ विद्यार्थी उत्तीण झाले आहे. दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यातून एकूण ९६.८६ टक्के मुली तर ९३.६३ मुले उत्तीर्ण झाले आहेत.

Web Title: SSC Result 2020; Saundad's Twinkle in Gondia district tops Uke district