चिमुकल्यांनी घातला पालकमंत्र्यांना घेराव
By Admin | Updated: August 22, 2015 00:22 IST2015-08-22T00:22:33+5:302015-08-22T00:22:33+5:30
गुरूनानक वॉर्डातील दारू दुकान बंद करण्याच्या मागणीला घेऊन परिसरातील चिमुकल्यांना स्वातंत्र्य दिनी जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांना घेराव घातला.

चिमुकल्यांनी घातला पालकमंत्र्यांना घेराव
गोंदिया : गुरूनानक वॉर्डातील दारू दुकान बंद करण्याच्या मागणीला घेऊन परिसरातील चिमुकल्यांना स्वातंत्र्य दिनी जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांना घेराव घातला. एवढेच नव्हे तर परिसरातील निरीक्षण करवून त्यांना दारू दुकान बंद करण्याच्या मागणीचे निवेदन दिले.
गुरूनानक वॉर्डात व्हाईट हॅवन बार एंड रेस्टॉरेंट मागील दोन महिन्यांपासून सुरू आहे. सन २००८ मध्ये बार संचालकांनी बारच्या परवान्यासाठी संबंधीत विभागाकडे अर्ज केला होता. मात्र परिसरातील नागरिकांनी याला तिव्र विरोध केला होता. परिणामी त्यांना परवाना देण्यात आला नव्हता. मात्र दोन महिन्यांपूर्वी त्यांना बारसाठी परवाना देण्यात आला. बार सुरू झाल्यामुळे या परिसरात दारूड्यांचा वावर वाढला असून त्यामुळे परिसरातील महिलांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. शिवाय येथे कधीही दारूच्या शौकींनाकडून वादावादीची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी परिसरात रहिवाश्यांत रोष व्याप्त आहे.
याबाबत परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य विभागांकडे दारू दुकान बंद करण्याची मागणी केली होती. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. यावर मात्र स्वातंत्र्य दिनी जिल्हाचे पालकमंत्री बडोले हे यामार्गाने जात असताना परिसरातील चिमुकल्यांनी त्यांना रस्त्यात अडविले. चिमुकल्यांनी पालकमंत्र्यांना गाडीतून उतरवून दारू दुकान दाखविले व परिस्थितीशी अवगत करवित दारू दुकान बंद करविण्याची मागणी करीत निवेदन दिले. यावर पालकमंत्र्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले. विशेष म्हणजे याप्रसंगी परिसरातील नागरिकांनी या प्रकरणात त्वरीत कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा दिला. (शहर प्रतिनिधी)