शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

सट्टा जोमात; ठाणेदार कोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:06 AM

शिस्त, गस्त व बंदोबस्त यांचे तंतोतंत पालन न करणाऱ्या पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाºयाला निलंबनाचा फटका सहन करावा लागत आहे. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तिरोडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप कोळी यांच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी मंगळवारी (दि.२०) रात्री उशीरा निलंबनाची कारवाई केली.

ठळक मुद्देसंदीप कोळी निलंबित : पोलीस अधीक्षकांची सलग दुसरी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शिस्त, गस्त व बंदोबस्त यांचे तंतोतंत पालन न करणाऱ्या पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्याला निलंबनाचा फटका सहन करावा लागत आहे. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तिरोडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप कोळी यांच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी मंगळवारी (दि.२०) रात्री उशीरा निलंबनाची कारवाई केली.ठाणेदार कोळी यांच्या निलंबनाच्या आदेशामुळे तिरोडा पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आणखी काही कर्मचाऱ्यांचे निलंबन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तिरोडा तालुक्यात सट्टा व्यवसाय जोमाने सुरू असल्यामुळे याचा दणका ठाणेदारालाच पोलीस अधीक्षकांनी दिला आहे. २० नोव्हेंबरला सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयातून आलेल्या बंद लिफाफ्यात तिरोडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप कोळी यांना निलंबीत केल्याचे आदेश असल्याची चर्चा सुरू होतीे. मात्र, रात्री ८.३० च्या दरम्यान पोलीस निरीक्षक कोळी यांनी आपला कार्यभार सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास गौते यांना सोपवून पोलीस ठाण्यातून निघून गेल्याने त्यांचे निलंबन झाल्याचे निश्चित झाले. याबाबत तिरोडा पोलीस ठाणे परिसरात असलेल्या चर्चेनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंद्यांना आळा घालण्याच्या हेतूने सर्व पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांना अवैध धंदे बंद करण्याचे निर्देश दिले.ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात अवैध धंदे सुरू असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची सूचना त्यांनी आधीच केली आहे. परंतु तिरोडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेले अनेक अवैध दारू, जुगार व सट्टयावर कारवाई करण्यात येत होती. तर मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्र ी, जुगार, सट्टा व अवैधधंदे सुरूच असल्याचे दिसून आल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी ठाणेदार संदीप कोळी यांना निलंबित केले. तिरोडा पोलीस ठाण्यातील आणखी काही कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.गोंदिया जिल्ह्यातील अवैध धंद्याला शह देणाऱ्या पोलीस कर्मचारी किंवा अधिकाºयांची गय केली जाणार नाही असा संदेश बैजल यांनी दिला आहे. दरम्यान या कारवाई संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला.नोटीसकडे दुर्लक्ष करणे भोवलेजिल्हा पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी दोन महिन्यांपूर्वीे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी आठ पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली होती. तेव्हाच तिरोड्याचे ठाणेदार संदीप कोळी यांना त्यांच्या क्षेत्रातील अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्याची सूचना करुन नोटीस बजावली होती. मात्र यानंतरही तिरोडा तालुक्यात सट्टा व अवैध दारु विक्री सर्रासपणे सुरु होती. त्यामुळे कोळी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.तिरोडा तालुक्यात चार कारवायाजिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने तिरोडा तालुक्यात मागील दोन दिवसात सट्टा व अवैध दारु विक्री प्रकरणी दोन कारवाया केल्या तर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुध्दा दोन कारवाया केल्या. यामुळेच बैजल यांनी कोळी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी