सोनालीला विद्यापीठाचा उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार

By Admin | Updated: August 7, 2015 01:44 IST2015-08-07T01:44:05+5:302015-08-07T01:44:05+5:30

गोंदिया शिक्षण संस्थाद्वारे संचालित न.मा.द. महाविद्यालयातील कला शाखेची विद्यार्थिनी सोनाली सुनिल उमरे .....

Sonali University's Best Student Award | सोनालीला विद्यापीठाचा उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार

सोनालीला विद्यापीठाचा उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार

गोंदिया : गोंदिया शिक्षण संस्थाद्वारे संचालित न.मा.द. महाविद्यालयातील कला शाखेची विद्यार्थिनी सोनाली सुनिल उमरे हिला विद्यापीठ उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्काराने विद्यापीठाच्या ९२ वर्धापन दिनानिमित्त सन्मानित करण्यात आले.
सदर पुरस्कार कुलगुरु डॉ. एस.पी. काणे यांच्या अध्यक्षतेत संसद सदस्य व योजना आयोगाचे पुर्व सदस्य प्रा. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते सोनालीला देण्यात आला. शिक्षणतज्ञ डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्र-कुलगुरु प्रा. प्रमोद येवले, कुलसचिव पुरण मेश्राम, बीसीयुडी संचालक डी.के. अग्रवाल यांच्या उपस्थितीत प्रशस्ती पत्र, स्मृती चिन्ह व रोख बक्षीस सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार रा.तु.म. नागपूर विद्यापीठातील संलग्नीत ६०० च्या जवळपास असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमधून न.मा.द. महाविद्यालयाची सोनाली उमरे हिने पटकाविला आहे.
तिने आपल्या यशाचे श्रेय गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष वर्षा पटेल, सचिव आमदार राजेंद्र जैन, महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश नासरे तसेच आपल्या आई वडिलांना दिले आहे. या यशाबद्दल प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Sonali University's Best Student Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.