लॉकडाऊनचा फायदा घेतला काही किराणा दुकानदारांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 05:00 IST2020-04-03T05:00:00+5:302020-04-03T05:00:06+5:30
लॉकडाऊनच्या काळात गोरगरीबांना अन्न धान्य मिळावे, जीवनावश्यक वस्तू कमी पडू नयेत, यासाठी मुख्यमंत्री, पंतप्रधान यांनी सूचना दिल्या. परंतु अनेक किराणा दुकानदारांनी आपापल्या दुकानातील साहित्य त्याच दरात न विकता मोठ्या प्रमाणात किंमत वाढविली आहे. ३२ रूपये किलोच्या दराने मिळणारी साखर ४० रूपये, ७० रूपये किंमतीची डाळ १०० रूपयांच्या पलीकडे गेली आहे. ८० रूपये किलो असलेले खाद्य तेल १४० रूपयावर गेले आहे.

लॉकडाऊनचा फायदा घेतला काही किराणा दुकानदारांनी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन केले आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या लॉकडाऊनचा गैरफायदा काही किराणा दुकानदार घेत आहेत. गोरगरीबांना अव्वाच्या सव्वा दरात साहित्य विक्री केली जात आहे. काहींनी मालाची साठेबाजी करून ठेवली आहे. परंतु पुरवठा अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
लॉकडाऊनच्या काळात गोरगरीबांना अन्न धान्य मिळावे, जीवनावश्यक वस्तू कमी पडू नयेत, यासाठी मुख्यमंत्री, पंतप्रधान यांनी सूचना दिल्या. परंतु अनेक किराणा दुकानदारांनी आपापल्या दुकानातील साहित्य त्याच दरात न विकता मोठ्या प्रमाणात किंमत वाढविली आहे.
३२ रूपये किलोच्या दराने मिळणारी साखर ४० रूपये, ७० रूपये किंमतीची डाळ १०० रूपयांच्या पलीकडे गेली आहे. ८० रूपये किलो असलेले खाद्य तेल १४० रूपयावर गेले आहे. मागील काही दिवसातच हा बदल किराणा दुकानदारांकडून करण्यात आला आहे.
याकडे जिल्हा पुरवठा अधिकारी, तालुका पुरवठा निरीक्षक यांनी लक्ष देऊन गोरगरीबांची होणारी पिळवणूक थांबवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
साठेबाजांवर कारवाई करा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठ्या व्यापाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तूची साठेबाजी केली आहे. त्यांचे गोदाम तपासण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी व तालुक्यातील निरीक्षक यांनी पुढे यावे. गोरगरीबांना योग्य दरातच त्यांना साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पुरवठा अधिकाऱ्यांनी यासंदर्भात किराणा दुकानदारांकडे बोगस ग्राहक पाठवून त्यांची माहिती काढणे आवश्यक आहे. साठेबाजांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यानी दिले आहेत. त्यावर गोंदिया जिल्ह्यात एकही साठेबाजावर कारवाई झाली नाही.