पेन्शनर कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:35 IST2021-09-17T04:35:08+5:302021-09-17T04:35:08+5:30
इंदोरा बुजरुक : तिरोडा पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी लिल्हारे यांना १४ सप्टेंबर रोजी झालेल्या पेन्शन अदालतमध्ये कास्ट्राईब कर्मचारी ...

पेन्शनर कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली काढा
इंदोरा बुजरुक : तिरोडा पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी लिल्हारे यांना १४ सप्टेंबर रोजी झालेल्या पेन्शन अदालतमध्ये कास्ट्राईब कर्मचारी महासंघ शाखा, तिरोडा व कास्ट्राईब शिक्षक संघटना, तिरोडाच्या संयुक्त विद्यमाने सेवानिवृत्त मागासवर्गीय कर्मचारी शिक्षक व अधिकाऱ्यांचे उपदान, अंश राशिकरण रजा, रोखीकरण, गटविमा, भविष्य निर्वाह निधी, प्रवासभत्ता बिल व इतर वेतन भत्ते तातडीने देण्यात यावेत, तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना तातडीने एकरकमी पेन्शन देण्यात यावी, सेवानिवृत्तीचा पहिला व दुसरा हप्ता रोखीने देण्यात यावा, आदी विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. सर्व समस्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन गटविकास अधिकारी लिल्हारे यांनी दिले. यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटना, तिरोडाचे तालुका अध्यक्ष संजय मेश्राम व त्यांचे सहकारी यांनी निवेदन दिले. यावेळी सहाय्यक प्रशासन अधिकारी पी. एफ. बन्सोड उपस्थित होते.