जिल्हा परिषदेत सौर कंदील खरेदी घोटाळा

By Admin | Updated: July 19, 2014 01:25 IST2014-07-19T01:25:55+5:302014-07-19T01:25:55+5:30

जिल्हा परिषदेअंतर्गत महिला व बालकल्याण

Solar lantern buying scam in Zilla Parishad | जिल्हा परिषदेत सौर कंदील खरेदी घोटाळा

जिल्हा परिषदेत सौर कंदील खरेदी घोटाळा

बंद सौर कंदीलांची खरेदी : निविदा स्वीकारताना वापरले पैशाचे वजन
आमगाव :
जिल्हा परिषदेअंतर्गत महिला व बालकल्याण विभागाकडून आदिवासी उपाययोजना, सर्वसाधारण योजना व विशेष घटक योजनेतील लाभार्थ्यांना शासन योजनेअंतर्गत सौर कंदील वाटप करण्यासाठी सौर कंदील पुरवठादारांकडून खरेदी करण्यात आले. परंतु निविदा काढताना पुरवठादारांना हाताशी घेवून निविदा देण्यात आल्या. त्यामुळे पुरवठादारांनी जिल्हा परिषदेला बंद असलेल्या सौर कंदीलांचा पुरवठा केला. लाभार्थ्यांनी मिळालेले बंद सौर कंदील प्रकल्प विभागाला परत केल्यावर या खरेदीमधील घोटाळा पुढे आला आहे.
महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद गोंदियाअंतर्गत आदिवासी उपाययोजना, सर्वसाधारण व विशेष घटक योजनेतील लाभार्थ्यांना सौर कंदील उपलब्ध करून देण्यासाठी सन २०१३-१४ ला ११ लाख ७६ हजार ९२० रुपयांची निविदा काढली. परंतु निविदा मॅनेज पद्धतीचा अवलंब झाल्याने पुरवठादारांचे भाग्य उजळून निघाले. त्यामुळे पुरवठादारांनी बंद असलेली सौर कंदीलाचा पुरवठा करुन सहमतीने घोळ केला.
शासनाच्या उपाययोजनेअंतर्गत आदिवासी, अनुसूचित जाती विशेष घटक या जाती प्रवर्गातील नागरिकांना सौर कंदीलाची मदत पुरवून त्यांच्यादारी प्रकाश पडावा या कल्याणकारी योजनेचे सार्थ आहे. परंतु प्रशासकीय स्तरावर शासनाच्या कल्याणकारी योजनांना स्वत:च्या घश्यात उतरविण्यासाठी पदाधिकारी व अधिकारी कसे समोर होतात हे बंद सौर कंदील प्रकरणावरुन पुढे आले आहे.
जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाने आदिवासी उपाययोजनाअंतर्गत लाभार्थ्यांकडून १० टक्के निधी स्विकारुन त्यांना सौर कंदील उपलब्ध करुन देण्यासाठी निविदा काढण्यात आली. यात गोंदिया बालप्रकल्प विभाग १ व २ करिता १४, तिरोडा ८, आमगाव १०, गोरेगाव ८, सालेकसा ७, सडक/अर्जुनी ६, अर्जुनी/मोरगाव ९, देवरी ९ अशा एकूण ७१ सौर कंदीलाकरिता प्रति नग तीन हजार प्रमाणे १ लाख ९१ हजार ६०० रुपये किमतीचे देयक मंजूर करण्यात आले. त्याचप्रमाणे विशेष घटक योजनेंतर्गत प्रकल्प गोंदिया १ व २ करिता सौर कंदील ४०, तिरोडा २३, आमगाव २१, गोरेगाव २१, सालेकसा १३, सडक/अर्जुनी २३, देवरी २१, अशा एकूण १७९ सौर कंदीलांकरिता प्रतिनग ३००० रुपये प्रमाणे ५ लाख ३७ हजार किंमतीचे देयक मंजूर करण्यात आले. त्याचप्रमाणे सर्वसाधारण योजनेअंतर्गत गोंदिया प्रकल्पाला १ व २ करिता ४३, तिरोडा २४, आमगाव २३, गोरेगाव २३, सालेकसा १६, सडक/अर्जुनी १९, मोरगाव अर्जुनी २४ व देवरी २२ अशा ११४ सौर कंदीलकरिता प्रतिनग २२४० प्रमाणे ४ लाख ४२ हजार ३२० रुपये किंमतीचे देयक मंजूर करण्यात आले. सौर कंदील पुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषदेने मे एग्रीज एलीड सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड नागपूर निर्मल पॉवर पुणे या कंपनीच्या नावाने निविदा काढण्यात आली. यासाठी जिल्हा परिषदेने अटी शर्तीअंतर्गत १२ फेब्रुवारी २०१४ व ३ मार्च २०१४ ला सौरकंदील पुरवठा करण्यासाठी पुरवठादारांना पत्र देण्यात आले. परंतु पुरवठादारांसोबत संगणमत करुन अटी शर्र्तींना धाब्यावर घालून सौर कंदील पुरवठा स्विकारण्यात आले. अधिकाऱ्यांनीही बंद सौर कंदील स्विकारुन जिल्ह्यात प्रकल्प कार्यालयांना पुरवठा केले. त्यामुळे लाभार्थ्यांनी सौर कंदीलासाठी लागणारे १० टक्के हिस्सावाटे देून कंदील प्राप्त केला.
प्रत्यक्षात त्यांचा वापर सुरू करताना ते सुरुच झाले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना तक्रार केली व दुरुस्तीकरिता प्रयत्न चालवले. परंतु सौर ऊर्जा कंदील सुरूच झाले नाही. आता अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांची फसवणूक केल्याची तक्रार लाभार्थ्यांनी केली. सौर कंदीलचा पूर्ण पुरवठा करण्यात आल्याचे उघड झाले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Solar lantern buying scam in Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.