सामाजिक न्याय दिन व राजर्षी शाहू जयंती साजरी
By Admin | Updated: June 28, 2014 01:10 IST2014-06-28T01:10:17+5:302014-06-28T01:10:17+5:30
दलितांचे कैवारी, अस्पृश्योधारक, सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून व प्राथमिक शिक्षण संचलनालय यांच्या परिपत्रकानुसार ...

सामाजिक न्याय दिन व राजर्षी शाहू जयंती साजरी
गोंदिया : दलितांचे कैवारी, अस्पृश्योधारक, सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून व प्राथमिक शिक्षण संचलनालय यांच्या परिपत्रकानुसार जिल्ह्यात ठिकठिकाणी सामाजिक न्याय दिन व शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. बनाथर : येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये सरपंच मोतन बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली, मुख्याध्यापक एस.एल. दिवेवार, शिक्षक जे.एस. शेख, सुनील तंगडपल्लीवार, एम.एन. भौतिक यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम ‘प्रवेशोत्सव आनंदोत्सव’ म्हणून साजरा करण्यात आला. सर्वप्रथम सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर व शाळा विकास समितीच्या सदस्यांनी शिक्षणविषयक जागृती करण्यासाठी प्रभातफेरी काढली. ‘शिक्षणाची वारी पालकांच्या दारी’, ‘शिक्षणाचा कायदा-समाजाचा फायदा’ यासारख्या उद्घोषांनी संपूर्ण वातावरण शिक्षणमय झाले होते. देशभक्ती गीत व सामाजिक समानतेचे गीत गाऊन विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्व व आवश्यता याची सर्वांना जाणीव करुन दिली. यानंतर प्रभात फेरीचे शाळेच्या प्रांगणात सभेत रुपांतर झाले. छत्रपती शाहू महराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीप प्रज्वलित करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी ज्येष्ठ शिक्षक सुनील तंगडपल्लीवार यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या अस्पृश्यता निवारणासाठी केलेल्या कार्याची, संस्थानिक असलेतरी त्याची पर्वा न करता प्रत्यक्ष कृतीतून केलेल्या त्यागाची, शिक्षण, व्यवसाय, सामाजिक रुढीविषयी केलेल्या कायद्यांची माहिती दिली. मुख्याध्यापक दिवेवार यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करुन या दिवसाचे विद्यार्थी जीवनातील महत्त्व पटवून दिले. तसेच प्रवेशोत्सव हा आनंदोत्सव होण्याकरिता शाळेतील सर्व घटक अधिकारी व पदाधिकारी, पालक-बालक यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन केले. यावेळी मान्यवरांनी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले. पाचवी ते आठवीच्या सर्वच विद्यार्थ्यांना पुस्तके वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन एस.बी. तंगडपल्लीवार यांनी तर आभार जे.एस. शेख यांनी मानले. कार्यक्रमासाठी एस.आर. दिघोरे, पी.एस. रहांगडाले, एल.बी. साठवणे, आय.एस. ठाकरे, पी.जी. बसेणे, वघारे, नैकाणे, राजपांडे यांनी सहकार्य केले. यानंतर लगेच सर्व विद्यार्थ्यांना मिठाई वितरीत करुन भोजन देण्यात आले. सालेकसा : शहीद अवंती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय काटेजमुरा येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य माहुले होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष धनराज नागपुरे, माजी उपाध्यक्ष सीताराम गौतम, प्रा. आर.टी. भुरकुडे, प्रा. गोपाल भदाडे, व्ही.एम. मानकर, एस.ए. मोहारे, के.जी. रहांगडाले, सी.बी. नागपुरे व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शाहू महराज यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य माहुले यांनी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन एच.पी. बन्सोड यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. कालीमाटी : जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा सुपलीपार येथे शाळेच्या पहिल्या दिवशी छत्रपती शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम गावातील मुख्य रस्त्याने प्रभातफेरी काढण्यात आली व पटनोंदणीचा संदेश लोकांना देण्यात आला. प्रभातफेरी शाळेत पोहचताच शालेय आवारात शाहू महाराज जयंती कार्यक्रम सुरू झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मनोज ब्राह्मणकर होते. प्रमुख अतिथी म्हणून दिवाकर चुटे, नान्हू मेंढे, मुख्याध्यापक एन.बी. बिसेन व सर्व शिक्षक उपस्थित होते. उपस्थितांनी शाहू महाराजांचे चरित्र सांगून सामाजिक न्याय दिवसाचे महत्व पटवून दिले. यावेळी शाळेमार्फत मुख्याध्यापक एन.बी. बिसेन यांनी शाळेतील पटनोंदणी व पोषणआहार याविषयीची माहिती गावकऱ्यांना दिली. शेवटी नवागतांचे स्वागत करुन व सर्व विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शालेय पुस्तकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन एम.ए. पडोले यांनी तर आभार ए.बी. रामटेके यांनी मानले. अंभोरा : फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचातर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अभियंता राजीव ठकरेले होते. अतिथी म्हणून सर्वजित बन्सोड, प्रवीण चौधरी व गावकरी बांधव उपस्थित होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या छायाचित्रावर माल्यार्पण व दीप प्रज्ज्वलनाने कार्यक्रमास सुरूवात झाली. सर्वजित बन्सोड यांनी आपल्या मार्गदर्शनात शाहु महाराजांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. राजीव ठकरेले व प्रवीण चौधरी यांनीही मार्गदर्शन केले. आंभोरा येथील सावित्रीबाई जोतिबा फुले सार्वजनिक वाचनालयात फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचातर्फे शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. अतिथी म्हणून कुवरलाल रहांगडाले, नरेंद्र गणवीर, शैलेश चंद्रिकापुरे, सुनील गणवीर, दिलीप गणवीर, रेखा बन्सोड, नम्रता चंद्रिकापुरे, पद्मा बन्सोड, शीला चंद्रिकापुरे, सोनाली बन्सोड उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विवेक बन्सोड तर आभार प्रदर्शन प्रतीक बन्सोड यांनी मानले. कार्यक्रमासाठी फुले, शाहु, आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष नितेश देशभ्रतार, सचिव, मुकेश गणवीर, कोषाध्यक्ष कपिल रामटेके व सदस्य शुभम रामटेके, रहांगडाले, दीप रामटेके, अंकुश चंद्रिकापुरे, जयेश रामटेके, संजीव वासनिक, राजा देशभ्रतार, जयप्रकाश ढोमणे, दिशांत काटेकर, रंजित रामटके, केशव रामटेके, प्रविण रामटेके यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)