सहा सगवान तस्करांना रंगेहात पकडले
By Admin | Updated: October 2, 2015 06:27 IST2015-10-02T06:27:43+5:302015-10-02T06:27:43+5:30
वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सडक/अर्जुनीअंतर्गत येणाऱ्या सहवनक्षेत्र शेंडा येथील कम्पार्टमेंट नंबर ४३६ मध्ये

सहा सगवान तस्करांना रंगेहात पकडले
सडक-अर्जुनी : वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सडक/अर्जुनीअंतर्गत येणाऱ्या सहवनक्षेत्र शेंडा येथील कम्पार्टमेंट नंबर ४३६ मध्ये सागवान चोरांना रंगेहात पकडण्यात वनविभागाला यश आले.
सहवनक्षेत्रातील घनदाट जंगलात चिराण चोरी होत असल्याची भनक क्षेत्र सहाय्यक पंढरी राघोर्ते यांना लागताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत सापळा रचुन सहा सागवान तस्करांना पहाटे ३ च्या सुमारास पकडले. त्यात हरिचंद टांगसु बावणे रा.शेंडा, अनिरूद्ध मनीराम पंधरे रा.मसरामटोला, योगेश गोपी सिरसाम रा.शेंडा, सुशिल फिरतुलाल सयाम रा.शेंडा, पवनकुमार लेखराम चक्रवर्ती रा.शेंडा आणि खोडू डूकरू परतेकी रा.आपकारीटोला या सहा आरोपींचा समावेश आहे.
त्या आरोपीकडून सागवान चिरान ३६ नग जप्त करण्यात आले. हे लाकूड ०.२७२ घनमीटर आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी गोवर्धन राठोड यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. क्षेत्रसहाय्यक पंढरी राघोर्ते, वनरक्षक गजानन मोहतुरे, गोपाल मुमुलमारे, बंडू चव्हाण, रमेश काळबांधे या वनरक्षकांसह वनमजदूर रमेश लंजे, नाजुक चुटे, मुलचंद मडावी दुर्योधन शेंडे, जेठू पुसाम यांचे आरोपींना पकडण्यात सहकार्याने मिळाले.(शहर प्रतिनिधी)