गोंदिया जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटात सहा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 12:16 IST2021-07-16T12:16:33+5:302021-07-16T12:16:56+5:30

Gondia News अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ताडगावटोली येथे गुरुवारी रात्री एका घरात सिलेंडरचा स्फोट होऊन सहा इसम जखमी झाल्याची घटना घडली.

Six injured in Gondia district gas cylinder explosion | गोंदिया जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटात सहा जखमी

गोंदिया जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटात सहा जखमी


लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ताडगावटोली येथे गुरुवारी रात्री एका घरात सिलेंडरचा स्फोट होऊन सहा इसम जखमी झाल्याची घटना घडली. जखमींवर भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमीत एकाच कुटुंबातील पाच तर शेजारील एका इसमाचा समावेश आहे. या ठिकाणी रहातअसलेल्या पंधरे यांच्या घरी हा स्फोट झाला. त्यात त्यांचे २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 

Web Title: Six injured in Gondia district gas cylinder explosion

टॅग्स :Accidentअपघात