२.७५ लाखांची चोरी करणाऱ्या सहा जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:47 IST2021-02-05T07:47:45+5:302021-02-05T07:47:45+5:30
गोंदिया : ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मोहरानटोली येथील विजया शैलेक ॲण्ड केमिकल्स कंपनीतून २९ डिसेंबर ते २६ जानेवारी दरम्यान ...

२.७५ लाखांची चोरी करणाऱ्या सहा जणांना अटक
गोंदिया : ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मोहरानटोली येथील विजया शैलेक ॲण्ड केमिकल्स कंपनीतून २९ डिसेंबर ते २६ जानेवारी दरम्यान ५१२ किलो ग्रॅम वजनाचा लाखदाना किंमत २ लाख ७६ हजार ४८० रुपयांचा माल चोरी करण्यात आला होता. या प्रकरणातील सहा आरोपींना गोंदिया ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींमध्ये अनिल नत्थूलाल जिजोते (२५) रा. बाजारटोला (काटी), महेश भिवा जिजोते (३८) रा. बाजारटोला (काटी), प्रदीप रमेश शनिचरे (२६) रा. वाॅर्ड क्रमांक ३ हट्टा ता. किरणापूर जि. बालाघाट (मध्यप्रदेश), चिंतामन किशन जिजोते (२५) रा. बाजारटोला (काटी), दुर्गेश कमलदाल तुमन्ने (३०) रा. बाजारटोला (काटी) व संजू राधेशाम तुमन्ने (३०) रा- वाॅर्ड क्रंमांक १० रामपायली ता. वारशिवनी जि. बालाघाट यांना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैशाली पाटील, पोलीस उपनिरीक्षक सडमेक, पोलीस नायक शरणागत, पारधी यांनी केली आहे.