साहेब गुड नाइट लावल्याशिवाय झोपच येत नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:31 IST2021-09-18T04:31:16+5:302021-09-18T04:31:16+5:30
केशोरी : सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे संपूर्ण परिसर जलमय झाल्याने कनेरीसह शिक्षक वसाहतीमध्ये डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ...

साहेब गुड नाइट लावल्याशिवाय झोपच येत नाही!
केशोरी : सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे संपूर्ण परिसर जलमय झाल्याने कनेरीसह शिक्षक वसाहतीमध्ये डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे गुड नाइट किंवा मच्छर पळविणारी अगरबत्ती लावल्याशिवाय झोपच येत नाही. त्यामुळे डासनाशक फवारणी करून ही समस्या दूर करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी केशोरी येथे डासनाशक औषधीची फवारणी करण्यात आली; परंतु कनेरीसह शिक्षक वसाहतीमध्ये फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढल्याने मलेरिया, डेंग्यू यासारखे आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाने याकडे लक्ष देऊन त्वरित डासनाशक फवारणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाने केशोरी येथे डासनाशक औषधीची फवारणी केली; परंतु या फवारणीपासून कनेरीसह शिक्षक वसाहतीला वगळण्यात आले होते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने परिसर जलमय झाला आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे कोरोनासह, मलेरिया, डेग्यू यासारखी आजार बळावण्याची भीती नागिरकांमध्ये निर्माण झाली आहे. या आजारापासून नागरिकांना धोका होऊ नये म्हणून त्वरित आरोग्य विभागाने लक्ष देऊन कनेरीसह शिक्षक वसाहतीमध्ये डासनाशक औषधीची फवारणी करण्याची मागणी ग्रामपंचायतीकडे नागरिकांनी केली आहे.