वेगवेगळ्या संस्थेच्या नावाने एकच कोटेशन
By Admin | Updated: December 29, 2014 23:46 IST2014-12-29T23:46:07+5:302014-12-29T23:46:07+5:30
सडक/अर्जुनी तालुक्यात तयार करण्यात आलेल्या वनतळीचे एकच कोटेशन वेगवेगय्या संस्थेच्या नावाने तयार करण्यात आले. ज्या संस्थांच्या नावाने कोटेशन तयार करण्यात आले

वेगवेगळ्या संस्थेच्या नावाने एकच कोटेशन
सौंदड : सडक/अर्जुनी तालुक्यात तयार करण्यात आलेल्या वनतळीचे एकच कोटेशन वेगवेगय्या संस्थेच्या नावाने तयार करण्यात आले. ज्या संस्थांच्या नावाने कोटेशन तयार करण्यात आले त्या संस्था अस्तित्वातच नसल्याचेही बोलले जाते.
वनतलावाचे बांधकामाचे इस्टीमेटला जे कोटेशन जोडले गेले ते कोटेशन एकाच व्यक्तिने वेगवेगळ्या कर्फच्या नावाने एकाच हस्ताक्षरात व एकाच तारखेला पुरविलेले आहेत. यात माती कामाचे जे कोटेशन जोडले आहे त्यात सिओटी, हर्टिंग झोन, व केसींग झोनकरीता कोणत्याच काळ्या मातीचा पुरवठाच झालेला नाही.
दुसऱ्या कोटेशनमध्ये मिक्सर मशीन, व्हायब्रेट मशीन सेटिंग व पाणी टँकर आदी साधनाचा वापर केल्याचे दाखविण्यात आले आहे. परंतु प्रत्यक्ष अशा कोणत्याही साधनाचा वापर करण्यात आला नाही. तिसरा कोटेशन लोखंड, सिमेंट पुरविण्याबाबत जोडला आहे. परंतु या वनतलावाच्या बांधकामात फक्त रपट्याकरीता सिमेंटचा वापर करण्यात आला आहे. लोखंड सळाखींचा वापर करण्यात आला नाही. या सर्वांचा बिल मात्र मंजूर करण्यात आले. सडक/अर्जुनीचे वनपरिक्षेत्राधिकारी तांत्रिक सल्लागार प्रत्यक्ष पाहणी केली. परंतु कंत्राटरांशी संगणमत असल्यामुळे त्यांनी बिल काढले. वरिष्ठ पातळीवरुन या प्रकरणाची कोणतीही दखल घेतली गेली नाही.
क्षेत्र सहायक कोसमतोंडी अंतर्गत मालीजुंगा येथे वनतळी बांधण्यासाठी शासनाकडून मंजुरी मिळाली. शासकीय मंजुरी १० फेब्रुवारी २०१२ ची आहे. या कामाचा कार्यारंभ आदेश क्र. १४५/२७/०२/२०१२ असून हे संपुर्ण काम मग्रारोहयो योजनेंतर्गत मंजुर करण्यात आले होते. परंतु वन अधिकाऱ्यांनी नियमाला धाब्यावर ठेवून खाजगी कंत्राटदाराकडून जेसीबी मशीन व ट्रॅक्टरद्वारे काम करण्यात आले.
यासाठी ८ लाख ४२ हजार ३९० रुपयाचा निधी ही मंजूर झाला होता. वनतलावांच्या कामात मातिकामाचे खोटे हजेरी पत्रक तयार करुन ३ लाख ३२ हजार ९० रुपयाची उचल करण्यात आली आहे. कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मालीजुंगा येथील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)