शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

‘ सिंघम अवतरणार; दहा मिनिटांत पोलिसांची मदत मिळणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:28 IST

नरेश रहिले गोंदिया : पोलीस प्रशासन जीपीएससारख्या प्रगत प्रणालीशी आपली हेल्पलाइन जोडत आहे. त्यामुळे आता येणाऱ्या प्रत्येक तक्रारीला ‘क्विक ...

नरेश रहिले

गोंदिया : पोलीस प्रशासन जीपीएससारख्या प्रगत प्रणालीशी आपली हेल्पलाइन जोडत आहे. त्यामुळे आता येणाऱ्या प्रत्येक तक्रारीला ‘क्विक रिस्पॉन्स’ मिळून ती समस्या कमीत कमी वेळेत सोडविण्यासाठी ११२ ही नवी हेल्पलाइन पोलीस दल सुरू करणार आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांत डायल ११२चे वाहन उपलब्ध झाले आहेत. सध्या २७ वाहने गोंदिया पोलीस दलाला मिळाले आहेत. पोलीस विभागाच्या मदतीसाठी १००या टोलफ्री क्रमांकांवर संपर्क साधल्यास तत्काळ मदत पुरविली जाते. मात्र, कधी मदत मिळण्यास विलंब झाल्यास पोलीस विभागावरच ताशेरे ओढले जायचे. नागरिकांमध्ये पोलिसांची प्रतिमा उंचविण्यासोबतच सर्वसामान्यांच्या तक्रारींचा निपटारा तातडीने करणे सोयीचे व्हावे म्हणून केंद्र सरकारने सर्व टोल फ्री क्रमांक आता एकाच क्रमांकावर करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात इमरजन्सी रिस्पॉन्स सिस्टीम या नावाने महिंद्रा ॲण्ड महिंद्रा ही कंपनी या योजनेची अंमलबजावणी करणार आहे. मुंबई आणि नागपूर येथे नियंत्रण कक्ष (पीसीसी) राहणार आहे. जिल्हास्तरावर इमरजन्सी रिस्पॉन्स व्हिकलचे (ईआरव्ही) स्वतंत्र युनिट स्थापन करण्यात आले आहे. यासाठी गोंदिया पोलीस दलात २७ वाहने दाखल झाली आहेत. आणखी किती वाहने येतील याची माहिती गोंदिया पोलिसांना नाही. मिळालेल्या वाहनात जीपीएस सिस्टीमसह अत्याधुनिक सुविधा आहेत. प्राथमिक स्तरावर सर्व प्रक्रिया घटनास्थळी दाखल झाल्यानंतर केल्या जाणार आहेत. याचा फायदा प्रकरणांचा निपटारा करण्यास होणार आहे. यामुळे समाजातील गरजूंना या माध्यमातून तत्काळ मदत पोहोचण्यास निश्चितच मदत होणार आहे. नागरिकांना या टोल फ्री हेल्पलाइनमुळे नक्कीच दिलासा मिळणार आहे.

......................

जिल्ह्यातील पोलीस ठाणे १६

पोलीस अधिकारी १२८

पोलीस कर्मचारी २२१०

..............................

२७ चारचाकी, ०० दुचाकी

डायल ११२साठी जिल्हा पोलीस दलात एकूण २७ चारचाकी दाखल झाल्या आहेत. जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांत हे अत्याधुनिक वाहन उपलब्ध होणार आहे. दुचाकी किती येतील यासंदर्भात आता काही माहिती नाही.

.....................

२५० पोलिसांना विशेष प्रशिक्षण

येत्या काही दिवसांतच डायल ११२ ही नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेविषयीचे ज्ञान उपलब्ध व्हावे, या उद्देशाने जिल्ह्यातील तब्बल २५० पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेतल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक (गृह) तेजस्वीनी कदम यांनी दिली आहे. प्रशिक्षणात संगणक व वायरलेसचे ज्ञान देण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्याद्वारे मार्गदर्शन करण्यात आले आहे.

..................

कॉल येताच कळणार लोकेशन

ही सेवा जीपीएस यंत्रणेद्वारा कार्यान्वित आहे. आपात्कालीन परिस्थितीतील कोणत्याही व्यक्तीने ११२ हा क्रमांक डायल केल्यास तो फोन तत्काळ मुंबई आणि नागपुरातील कॉल सेंटरला जाईल. तेथून घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटना घडलेल्या परिसरात पोलिसांच्या जीपीएस व्हॅनमधील लॅपटॉपवर तसेच बॉमटाॅम जीपीएस यंत्रणा असलेल्या दुचाकीवरील मार्शलला मिळणार आहे. त्यामुळे मार्शल लगेच घटनास्थळी पोहचून मदत करणार आहे.

..........................

पोलीस मदत हवी असल्यास ११२ डायल करा

-सर्वसामान्य नागरिकांनी डायल ११२ क्रमांकाशी संपर्क साधल्यानंतर थेट नागपूर येथील नियंत्रण कक्षातील कर्मचारी संवाद साधतील. या संवादात ठिकाण व समस्येचे स्वरूप आणि नाव नोंदविले जाईल. त्यानंतर कंट्राेलरुममधून थेट त्या क्षेत्रातील इमरजन्सी रिस्पॉन्स व्हेईकल युनिटमधील कर्मचाऱ्यांशी काही सेकंदात संपर्क साधला जाईल.

-पोलीस अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी जाऊन मदत करतील. कंट्राेल रुम ते लोकल कनेक्शनमुळे तक्रारींचा निपटारा होण्यास किंवा सर्वसामान्यांना मदत मिळणे सहज शक्य होणार आहे.

.....................

गोंदिया पोलीस दलाला ११२ची २७ वाहने मिळालेली आहेत. आणखी किती वाहने मिळणार हे पुढे काही सूचना आल्यावर कळेल. ही यंत्रणा नागरिकांच्या सेवेसाठी सुरू होईल, या यंत्रणेमुळे सर्वसामान्यांच्या तक्रारी आल्यास तत्काळ मदत मिळणार आहे.

तेजस्वीनी कदम, पोलीस उपअधीक्षक (गृह) गोंदिया

...................