शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी आदर्श शाळा सिंदीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 06:00 IST

सडक अर्जुनी तालुक्यातील सिंदीपार शाळा सध्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी राबविण्यात येणार विविध उपक्रमांमुळे नावारूपाला आली आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासह परिसर अभ्यास आणि शेती करण्याचे आणि स्वयंशासनाचे धडे दिले जात आहे. सिंदीपार येथे केळीच्या बागा, बोरी, भाजीपाला, टरबूज आदी नगदी पिके घेणारी आधुनिक शेती केल्या जाते.या गावातील नागरिकही शिक्षित आहेत.

ठळक मुद्देसामान्य ज्ञानात विद्यार्थी तरबेज : परिसर अभ्यासावर भर, अत्याधुनिक साधनाची मदत

लोकमत न्यूज नेटवर्कसौंदड : शिक्षणाकडे बघण्याचा पालकांचा दृष्टीकोण आता बदलत चाललाय. प्रत्येक पालक आपल्या मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आर्थिक बोजा सहन करायला तयार आहे. अशीच एक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी धडपडणारी शाळा म्हणजे जि.प.प्राथमिक शाळा सिंदीपार होय.सडक अर्जुनी तालुक्यातील सिंदीपार शाळा सध्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी राबविण्यात येणार विविध उपक्रमांमुळे नावारूपाला आली आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासह परिसर अभ्यास आणि शेती करण्याचे आणि स्वयंशासनाचे धडे दिले जात आहे. सिंदीपार येथे केळीच्या बागा, बोरी, भाजीपाला, टरबूज आदी नगदी पिके घेणारी आधुनिक शेती केल्या जाते.या गावातील नागरिकही शिक्षित आहेत. आधुनिक शेतीपासून ते कोणत्याही क्षेत्रात भरारी घेण्यासाठी शिक्षणाची नितांत गरज असल्याचे येथील गावकरी सांगतात.त्यामुळेच आपल्या पाल्यांना शाळेत चांगले शिक्षण मिळावे यासाठी ते लोकसहभागातून शाळेला नेहमी सहकार्य करीत असतात. गावकऱ्यांकडून मिळणारे सहकार्यामुळेच येथील शिक्षकांनी शाळेच्या गुणवत्तेची दिशा बदलण्याचा निर्धार केला. बदललेली शिक्षण पद्धती, तंत्रज्ञानाचा होत असलेला वापर, दिक्षा अ‍ॅप, युट्यूब, दुरदर्शनवरील मिराकास्टच्या माध्यमातून विषय ज्ञान सुलभ होण्याच्या दृष्टीने दाखविलेले दृश्य आदींचा वापर करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. शाळेतील प्रसन्न व निसर्गरम्य वातावरणात मुलांना मनोरंजक व खेळीमेळीच्या वातावरणात शिकविले जाते. ज्ञानरचनावादाच्या शैक्षणिक साहित्यातून मुलांच्या गणित व इंग्रजी, मराठी विषयात तरबेज केले जात आहे.मुख्याध्यापक आर.आर.बोरकर यांच्या मार्गदर्शनाखली सुभाष कठाणे या उमद्या शिक्षकाने नवकल्पना आणून गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.मराठीतील एक मुळाक्षर एक सामान्य ज्ञान अशा अभिनव पद्धतीने शिक्षण देऊन वाचनाबरोबरच इतर ज्ञान देण्याचा प्रयत्न केला जातो. वर्गातील चेंडूच्या माध्यमातून एकक, दशक, संकल्पना, बेरीज, वजाबाकी, पाढे इत्यादी संकल्पना मुलांमध्ये रूढ केली जात आहे. इंग्रजी हे तर आजच्या आधुनिक शिक्षणाचे मूळ गुणसूत्र त्यामुळे इंग्रजी वाचनाबरोबर संवादावर देखील भर देण्याचा प्रयत्न या शाळेतील शिक्षक करित आहेत. 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी