सांघिक खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 21:44 IST2017-09-16T21:43:27+5:302017-09-16T21:44:08+5:30

सांघिक पध्दतीच्या खेळांमध्ये प्रत्येक खेळाडूंचा एकमेकांशी संवाद असतो. त्यामुळे संघ भावनेची वाढ होते. कुणी आपल्या संघासाठी खेळतो त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे.

The significance of the team game is unique | सांघिक खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण

सांघिक खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण

ठळक मुद्देमंगेश मोहिते : अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सांघिक पध्दतीच्या खेळांमध्ये प्रत्येक खेळाडूंचा एकमेकांशी संवाद असतो. त्यामुळे संघ भावनेची वाढ होते. कुणी आपल्या संघासाठी खेळतो त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. सांघिक खेळामुळे एकात्मतेची भावना निर्माण होत असल्याने अशा प्रकारच्या खेळाचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते यांनी येथे केले.
शुक्रवारी इंदिरा गांधी स्टेडियम येथे जिल्हा क्र ीडा कार्यालय, शिक्षण विभाग जिल्हा परिषद आणि जिल्हा क्रीडा परिषदेतर्फे ‘अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय’ या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी अनंत वालसकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, उपशिक्षणाधिकारी सुरेश मांढरे, स्काऊट गाईड कार्यालयाच्या जिल्हा संघटक मनिषा तराळे, तालुका क्रीडा संयोजक एस.ए.वहाब, फुटबॉल असोशिएशनचे खुर्शिदभाई, लेखाधिकारी एल.के.बाविस्कर, डॉ.हरगोविंद चौरसीया, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार उपस्थित होते.
मोहिते म्हणाले, सांघिकपणे खेळतांना मदत केली पाहिजे ही भावना देशपातळीवर देखील दिसून येते. एकमेकांशी आपली स्पर्धा असते. मात्र संघ म्हटला की आपण सर्वजन सारखे असतो. संघासाठी आपण एकमेकांना मदत करतो. जीवनात प्रत्येकाने एकमेकांना मदत केली तर प्रत्येक व्यक्ती यशस्वी होवू शकतो असेही ते म्हणाले. यावेळी क्रीडा क्षेत्रात योगदान देणाºया तालुका क्रीडा संयोजक एस.ए.वहाब, फुटबॉल असोशिएशनचे खुर्शिदभाई यांचा अपर जिल्हाधिकारी मोहिते यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
गांगरेड्डीवार म्हणाले, आॅक्टोबर महिन्यात फिफा वर्ल्ड कप फुटबॉल आयोजन भारतात करण्यात आले आहे. त्यापैकी ६ सामने मुंबई येथे होत आहेत. ग्रामीण भागात सुध्दा फुटबॉल खेळाची चळवळ गतीमान झाली पाहिजे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा मार्गदर्शक नाजुक उईके, वरिष्ठ लिपीक डी.एस.बारसागडे, शिवचरण चौधरी, रवी परिहार यांनी सहकार्य केले.
जिल्ह्यातील १२ हजारांवर खेळाडूंचा सहभाग
जिल्ह्यात शुक्रवारी १२ हजार ३२० खेळाडूंनी फुटबॉल खेळून या खेळाला प्रोत्साहान देण्याचे काम केले. यामध्ये ८ हजार २२० मुले आणि ४१०० मुलीचां समावेश आहे. जिल्ह्यातील विविध मैदानावर १२ हजारावर खेळाडूंनी फुटबॉल यात सहभागी होत आनंद फुटबालचा आनंद लुटला.
विविध शाळा महाविद्यालयांचा सहभाग
‘अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय’ या कार्यक्रमात गोंदिया येथील एनएमडी महाविद्यालय, एस.एस.गर्ल्स महाविद्यालय, मनोहर मुन्सीपल हायस्कूल,राजस्थानी मारवाडी हायस्कूल, महावीर महाविद्यालय, गुरु नानक इंग्लीश स्कूल, मनोहर मुन्सीपल कॉन्व्हेंट, एन.एम.पटेल महाविद्यालय, गोंदिया फुटबॉल अ‍ॅकेडमी, सिटी क्लब गोंदिया आदी संघाचे फुटबॉल खेळाडू उपस्थित होते.

Web Title: The significance of the team game is unique

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.