सिद्ध शक्तिपीठ मॉ गढमाता त्रिपूर सुंदरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 06:00 AM2019-09-30T06:00:00+5:302019-09-30T06:00:13+5:30

नवरात्रीमध्ये ज्योत स्थापना करुन नवस फेडणाऱ्या भाविकांची नेहमी मनोकामना पूर्ण होत असते. त्यामुळे या देवस्थानात पूर्ण होत असते. त्यामुळे या देवस्थानात ज्योत स्थापना विशिष्ट पद्धती पूर्ण आस्थेने केली जाते. गोंदिया जिल्हा मुख्यालयापासून ४० कि.मी.अंतरावर असलेल्या या देवस्थानाच्या इतिहास एक अनोखी कहानी दर्शविणारा आहे.

Siddha Shaktipeeth Ma Gadhamata Tripur Sundari | सिद्ध शक्तिपीठ मॉ गढमाता त्रिपूर सुंदरी

सिद्ध शक्तिपीठ मॉ गढमाता त्रिपूर सुंदरी

Next
ठळक मुद्देनिसर्गरम्य धार्मिक पर्यटन स्थळ : स्वयंभू देवी देवतांचे समूहस्थळ, नव दुर्गा दर्शन

विजय मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : रेल्वे स्टेशनपासून दोन किलोमिटर अंतरावर नैसर्गिक परिसरात पहाडावर स्थापित असलेले मॉ गडमाता देवी त्रिपूर सुंदरीचे देवस्थान एक जागृत सिद्धपीठ म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे. या ठिकाणी वर्षभर भक्तांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी रांग लागलेली असते.
या ठिकाणी नवरात्रीमध्ये ज्योत स्थापना करुन नवस फेडणाऱ्या भाविकांची नेहमी मनोकामना पूर्ण होत असते. त्यामुळे या देवस्थानात पूर्ण होत असते. त्यामुळे या देवस्थानात ज्योत स्थापना विशिष्ट पद्धती पूर्ण आस्थेने केली जाते. गोंदिया जिल्हा मुख्यालयापासून ४० कि.मी.अंतरावर असलेल्या या देवस्थानाच्या इतिहास एक अनोखी कहानी दर्शविणारा आहे.
या ठिकाणी देवस्थान स्थापित केल्याची सुरुवात कधी झाली याबद्दल विचारले असता ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सन १९३३ मध्ये सालेकसा रेल्वे स्टेशनवर एक मोठी डाकपेटी उतरली. परंतु ती डाकपेटी कोणाची होती त्याचे नाव पेटीवर नव्हते.
त्यामुळे ती पेटी काही दिवस स्टेशनवर पडून राहिली. पाठविणाऱ्याचा सुद्धा पता नसल्याने तिला परत पाठविणे पण शक्य नव्हते. काही दिवसानंतर स्टेशन मास्तरने सालेकसा येथील पोलीस पाटील आणि गावातील इतर काही मान्यवर लोकांना बोलावून त्या पेटीचा पंचनामा करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा पंचनामा करुन पेटी उघडण्यात आली. तेव्हा त्यातून दगडावर कोरलेली देवीची मूर्ती प्राप्त झाली.
ही मूर्ती कोणी पाठविली, कुठून आली याबद्दल अनेक प्रश्न व चर्चा चालत असताना सर्व गावकरी आणि रेल्वे स्टेशन मास्तर व इतर कर्मचाऱ्यानी मुर्तीची योग्य ठिकाणी स्थापना करुन प्राणप्रतिष्ठा करण्याचे ठरविले.
यासाठी लोकांनी कुआढास नाल्यालगत नैसर्गिक स्थळाच्या पहाडावर मूर्तीची स्थापना केली. मातेच्या मूर्तीला उंच गढावर स्थापित करण्यात आले. त्यामुळे या देवस्थानाला ‘गडमाता देवस्थान’ असे नाव देण्यात आले.

स्टेशन मास्तरनी स्विकारली सेवा
याच दरम्यान आठ कि.मी. अंतरावर असलेले धानोली रेल्वे स्टेशन येथे स्टेशन मास्तर म्हणून शिवारात बाबू नावाचे देवी भक्त कार्यरत होते. ते शक्तीस्वरुपा देवीचे उपासक होते. त्यांना एक दिवस स्वप्न पडले आणि त्याच्या स्वरुपात देवीने आपले रुप प्रकट करुन गडमाता देवीची नियमित पूजा करण्याचे आवाहन केले. त्यानुसार त्यांनी देवी पूजनाला सुरुवात केली. एवढ्यात त्यांना रेल्वे स्टेशन मास्तर पदावरुन पदोन्नतीचा आदेश आला. हा आदेश त्यांच्यासाठी मोठ्या फायद्याचा होता. परंतु त्यांना बढतीवरुन दुसºया ठिकाणी जावे लागत होते. त्यामुळे त्यांच्यासमोर पेच निर्माण झाला. परंतु त्यांनी आपली पदोन्नती धुडकावून गडमाता देवीच्या चरणी उर्वरित आयुष्य अर्पण करण्याचा निर्धार केला.

क दर्जाचे पर्यटन स्थळ घोषित
काही वर्षापूर्वी या स्थळाला ‘क’ दर्जाचे पर्यटनस्थळ घोषित करुन विकसित करण्यास मदत देण्यात आली. हळूहळू या ठिकाणी मुख्य मंदिर परिसरात स्वयंभू दुर्गा मंदिर, काली मंदिर, भैरव बाबा मंदिर, शिव मंदिर, मॉ ज्योतेश्वरी मंदिर व इतर अनेक देवी देवतांचे मंदिर स्थापित करण्यात आले आहे.

निसर्गरम्य परिसराचे वरदान
शहरापासून दूर उंच पहाडावर असलेल्या या देवस्थानाच्या चारही बाजूला मनमोहक नयनरम्य परिसर व पहाडाच्या पायथ्याशी वाहत असलेला मोठा नाला, बाजूला एक जलकुंड आहे. येथे वर्षभर पाणी साचून राहते. दक्षिण भागातून जंगलाच्या हिरवळ भागातून रेल्वे गाडी जाताना या पहाडावरुन बघण्यासारखे दृश्य असते. चारही बाजूला घनदाट जंगल असल्याने येथे भरपूर ऑक्सिजन मिळत असते. या ठिकाणी वर्षभर अनेक सरकारी, गैरसरकारी कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा केले जाते. सालेकसा तालुक्याला अनेक नैसर्गिक व धार्मिक पर्यटन स्थळाचा वारसा लाभलेला आहे. त्यापैकी गढमाता मंदिर सिद्ध शक्तीपीठ म्हणून भाविकांना आपल्याकडे आकर्षित करीत असते.

Web Title: Siddha Shaktipeeth Ma Gadhamata Tripur Sundari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.