१६ जोडप्यांचे शुभमंगल
By Admin | Updated: March 30, 2015 01:13 IST2015-03-30T01:13:12+5:302015-03-30T01:13:12+5:30
गायत्री परिवार व तालुक्यातील ग्राम खैरबोडी वासीयांच्या संयुक्तवतीने २८ मार्च रोजी रामनवमीच्या पावन पर्वावर गावातील प्राथमिक शाळेच्या मैदानावर...

१६ जोडप्यांचे शुभमंगल
तिरोडा : गायत्री परिवार व तालुक्यातील ग्राम खैरबोडी वासीयांच्या संयुक्तवतीने २८ मार्च रोजी रामनवमीच्या पावन पर्वावर गावातील प्राथमिक शाळेच्या मैदानावर आयोजित नि:शुल्क सर्वजातीय सामूहिक आदर्श विवाह संस्कार सोहळा थाटात पार पडला . या नि:शुल्क सर्वजातीय विवाह सोहळ््यात १६ जोडप्यांचे शुभमंगल लावण्यात आले.
क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले व जिल्हा परिषद सदस्य राजलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या विवाह सोहळ््यात अजय दिनदयाल बोपचे संग उषा नारायण कोल्हे, भूमेश्वर पृथ्वीराज पटले संग दिप्ती राजेंद्र चौधरी, तिरुपती हेमराज राणे संग रूपेश्री पृथ्वीराज पटले, सोहनलाल राधेशाम पटले संग रुपकला जयदेव ठाकरे, लिलाधर चोलदास पाटील संग ईश्वरी बैरागी भगत, सुरेश वातू काळे संग सरीता कुवरलाल क्षीरसागर, प्रविण गणेश उदापूरे संग रिना आत्माराम डोमळे, संजय कुंजीलाल बावणे संग सोनू अमर वक्कलकार, दुर्गेश आंजर कोसरे संग सीमा कुंजीलाल बावणे, मोरेश्वर मंगलदास ढेंगे संग दीपाली तुलाराम सदावर्ती, विनोद ईश्वर तिरपुडे संग सिनीया सुरज मेश्राम, मनोहर शोभा वाकडोत संग शिल्पा बुधागोश डोंगरे, धिरेंद्र शिवदास खोब्रागडे संग प्रियंका मंगरू टेंभरे, पुनमसिंग रणधिरसिंग चव्हाण संग इंदू भरत गाडे , अमित राजेंद्र नागपुरे संग अनिता देवीलाल राऊत, मोतीलाल होलीराम पटले संग निताली रेवाराम रिनाईतकर अशा १६ जोडप्यांचे शुभमंगल हरिद्वार येथील विशेष प्रतिनिधींच्या हस्ते लावण्यात आले.
विवाह सोहळ््यासाठी सरपंच शुकंतला परतेती, भाऊलाल भगत, उपसरपंच चंद्रशेखर गजभिये, नंदकिशोर तुरकर, डॉ. कटरे, देवराव कटरे, अजय बोपचे, शिवा पटले, बारकन पटले, डॉ. प्रभू बिसेन, मार्कंड पटले, रंगलाल रहांगडाले, टोलीराम कावळे, गंगाधर पारधी, यशवंत भगत, नितीन हरिणखेडे, महादेव पटले, धमेंद्र बोपचे, मुन्नीलाल कटरे, डॉ. योगेंद्र भगत, ललीत पटले, संजय पारधी, रमेश ठाकरे, धमेंद्र मराठे, प्यारेलाल बिसेन, नरेश पारधी, धार्मिक हरिणखेडे, अनंत ठाकरे, संदीप तुरकर, कार्तिक पारधी, राजेश येळे, छोटेलाल नंदरधने, नंदू बिसेन, रामकृष्ण पुडके यांनी सहकार्य केले. खैरबोडीवासीयांच्या या कार्याची परिसरात चर्चा आहे. (शहर प्रतिनिधी)