कार्यालयात उशिरा येणाऱ्या ८१ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 05:00 IST2021-01-02T05:00:00+5:302021-01-02T05:00:27+5:30
वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने कर्मचारी उशीर होतीलच; परंतु जास्त उशीर होऊ नये म्हणून कर्तव्यदक्ष असलेल्या प्रदीप डांगे यांनी सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांत स्वत: जाऊन पाहिले. त्यावेळी आरोग्य विभागातील ३४ कर्मचारी, पशुसंवर्धन विभागाचे तीन कर्मचारी, वित्त विभागाचे तीन कर्मचारी, पाणीपुरवठा विभागाचे सात, शिक्षण विभागाचे १२, पाणी व स्वच्छता विभागाचे आठ, लघु पाटबंधारे विभागाचा एक, महिला व बालकल्याण विभागाचा एक, तर बांधकाम विभागाचे १२ कर्मचारी उपस्थित नव्हते.

कार्यालयात उशिरा येणाऱ्या ८१ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : एखादा कर्मचारी महिन्यातून तीन वेळा उशिरा कार्यालयात येत असेल तर त्याची एक दिवसाची नैमित्तिक रजा वजा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने ३१ डिसेंबर २०२० रोजी काढला. या शासन निर्णयाची दखल घेत गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) नरेश भांडारकर यांनी ३१ ङिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागात जाऊन पाहिले असता विविध विभागांतील तब्बल ८१ कर्मचारी वेळेत कार्यालयात आले नसल्याने त्यांच्या विभागप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेने महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी पहिल्याच दिवशी केली. वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने कर्मचारी उशीर होतीलच; परंतु जास्त उशीर होऊ नये म्हणून कर्तव्यदक्ष असलेल्या प्रदीप डांगे यांनी सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांत स्वत: जाऊन पाहिले. त्यावेळी आरोग्य विभागातील ३४ कर्मचारी, पशुसंवर्धन विभागाचे तीन कर्मचारी, वित्त विभागाचे तीन कर्मचारी, पाणीपुरवठा विभागाचे सात, शिक्षण विभागाचे १२, पाणी व स्वच्छता विभागाचे आठ, लघु पाटबंधारे विभागाचा एक, महिला व बालकल्याण विभागाचा एक, तर बांधकाम विभागाचे १२ कर्मचारी उपस्थित नव्हते.
या ८१ कर्मचाऱ्यांमुळे त्यांच्या विभागप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. यानंतर हलगर्जीपणा झाल्यास गय केली जाणार नाही, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे यांनी दिला आहे.