प्राथमिक आरोग्य केंद्रात लसींचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:26 IST2021-04-12T04:26:49+5:302021-04-12T04:26:49+5:30

केशोरी : कोरोना विषाणूच्या महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक असलेल्या लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून अनेक नागरिकांना ...

Shortage of vaccines in primary health centers | प्राथमिक आरोग्य केंद्रात लसींचा तुटवडा

प्राथमिक आरोग्य केंद्रात लसींचा तुटवडा

केशोरी : कोरोना विषाणूच्या महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक असलेल्या लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून अनेक नागरिकांना लसीविनाच घरी परत जावे लागले. कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी कल वाढल्यामुळे गर्दी होऊ लागली आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा आरोग्य प्रशासनाने मुबलक लसींचा पुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

शासनाने ज्येष्ठ नागरिकांनंतर ४५ वर्षांवरील प्रत्येक नागरिकासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ, पिंकू मंडल यांच्या मार्गदर्शनात गेल्या १५ दिवसांपासून लसीकरण सुरु आहे. लसींच्या उपलब्धतेनुसार नियोजन करुन लस देणे सुरु असले तरीही येथील प्राथमिक आरोग्य केद्रांतर्गत ५ आरोग्य उपकेद्र कार्यान्वित आहेत. यामधील लोकसंख्येच्या प्रमाणात कोरोना लसीकरण साठा पुरविणे आवश्यक असताना आणि लसीकरणाचा वेग लक्षात घेता मुबलक लस पुरवठा होणे अपेक्षित आहे.

जिल्ह्यासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी नागरिकांचा कल वाढत आहे. मात्र, येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लस शनिवारी संपल्यामुळे अनेक नागरिकांना घरी परत जावे लागले. सध्या गाव व परिसरात अनेक कोरोना बाधित रुग्ण अलगीकरणात उपचार घेत आहेत. कोविड प्रतिबंधात्मक लसींचा साठा तत्काळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

---------------------------

कोट

जिल्हा प्रशासनाकडून साठा प्राप्त होताच लसीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरु करण्यात येईल. कोरोना रौद्ररुप धारण करु पाहात आहे. मात्र, कोणीही घाबरुन जाण्याची गरज नाही. कोरोना लसीपासून कोणीही वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल.

डॉ. पिंकू मंडल, आरोग्य अधिकारी

Web Title: Shortage of vaccines in primary health centers