लग्नाचे आमिष देत तरूणीचे लैंगिक शोषण

By Admin | Updated: June 28, 2014 01:08 IST2014-06-28T01:08:35+5:302014-06-28T01:08:35+5:30

लग्नाचे आमिष देत तरूणीचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीसह चौघांवर रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Sexual exploitation of the young woman giving marriage brood | लग्नाचे आमिष देत तरूणीचे लैंगिक शोषण

लग्नाचे आमिष देत तरूणीचे लैंगिक शोषण

गोंदिया : लग्नाचे आमिष देत तरूणीचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीसह चौघांवर रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. टीबीटोलीच्या बिसेन पेट्रोलपंप मागील भागात राहणाऱ्या ३० वर्षाच्या तरूणीचे मागील नऊ वर्षापासून लग्नाचे आमिष देत लैंगिक शोषण करण्यात आले. आरोपी अविनाश प्रभाकर भांवडकर याने सन २००२ पासून २०१० पर्यंत तिला लग्नाचे आमिष देत तिच्याशी शारिरिक संबध प्रस्तापित केले.
त्यानंतर तिला अविनाश सोबत लग्न करून देऊ असे शोभा प्रभाकर भांवडकर, नेहा अविनाश भावंडकर व विजय बावणकर यांनी म्हटले. परंतु तिचे लग्न लवून न देता तिल दोन वर्षापासून तिला भूलथापा देत राहीले. ती लग्नासाठी विचारणा करण्यासाठी गेली असताना आरोपींनी तिला मारहाण केली. मागील अनेक वर्षापासून होत असलेल्या या प्रकाराला कंटाळून अखेर तिने रामनगर पोलिसात धाव घेतली.
सदर घटनेसंदर्भात रामनगर पोलिसांंनी सदर आरोपींवर भादंविच्या कलम ३७६, ४२०, ४१७, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपी अविनाश प्रभाकर भांवडकर याला अटक करण्यात आली. उर्वरीत आरोपी फरार आहेत. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Sexual exploitation of the young woman giving marriage brood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.