वृद्धेवरील बलात्कारप्रकरणी सात वर्षांची शिक्षा

By Admin | Updated: March 18, 2015 01:00 IST2015-03-18T01:00:54+5:302015-03-18T01:00:54+5:30

शेतात बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षाच्या वृध्द महिलेवर ३६ वर्षाच्या इसमाने बलात्कार केला होता. त्याला जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी सात वर्षाची शिक्षा ...

Seven years of punishment for rape in old age | वृद्धेवरील बलात्कारप्रकरणी सात वर्षांची शिक्षा

वृद्धेवरील बलात्कारप्रकरणी सात वर्षांची शिक्षा

गोंदिया : शेतात बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षाच्या वृध्द महिलेवर ३६ वर्षाच्या इसमाने बलात्कार केला होता. त्याला जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी सात वर्षाची शिक्षा व पाच हजार रूपये दंड ठोठावला आहे.
गोंदिया तालुक्याच्या दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मुर्दाळा येथील दिलीप सत्तू मस्करे (३६) याने गावातीलच ६५ वर्षाच्या वृध्द महिलेवर बलात्कार केला. ते बकऱ्या चारण्यासाठी गावातील लखनसाव जगणे यांच्या शेतात गेली असता एकांतवास पाहून आरोपीने तिच्यावर बळजबरी केली. त्यानंतर तिने हे प्रकरण कुणाला सांगू नये यासाठी तिला ३ तास नजर कैदेत ठेवले.
त्याच्यापासून सुटका करण्यासाठी त्या वृध्द महिलेने गावातीलच कुसोबा अंतु मस्करे यांची मदत घेतली. कुसोबा आपल्या शेताकडे जात असताना त्यांना हातवारे करून बोलावले. ते येताच आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना ३ जानेवारी २०१२ च्या दुपारी १२ ते ३.३० वाजता दरम्यान घडली. या घटनेसंदर्भात दवनीवाडा पोलिसांनी भादंविच्या कलम ३७६, ३४२ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणाचा तपास ठाणेदार एम.आर. पठाण यांनी केला होता. या प्रकरणावर जिल्हा सत्र न्यायाधीश एम.जी. गिरटकर मंगळवारी सुनावणी करताना आरोपीला भादंविच्या कलम ३७६ अन्वये सात वर्षाचा सश्रम कारावास व ५हजार रूपये दंड, कलम ३४२ अन्वये एक वर्षाचा कारावास सुनावला आहे. सदर प्रकरणात फिर्यादीची बाजू सरकारी वकील सुजाता तिवारी यांनी मांडली. न्यायालयीन कामकाजासाठी पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात सीएमएस सेलचे प्रभारी महेश महाले व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Seven years of punishment for rape in old age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.