सात शिक्षक झाले मुख्याध्यापक
By Admin | Updated: July 24, 2015 01:19 IST2015-07-24T01:19:00+5:302015-07-24T01:19:00+5:30
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांची पदोन्नती मुख्याध्यापक म्हणून करण्यात आली.

सात शिक्षक झाले मुख्याध्यापक
गोंदिया : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांची पदोन्नती मुख्याध्यापक म्हणून करण्यात आली. जिल्ह्यातील सात शिक्षकांना मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती देण्यात आली. त्यात दोन महिलांचा समावेश आहे.
जि.प. हायस्कूल नवेगावबांध येथील शिक्षक डी.के. मस्के यांना जि.प. हायस्कूल अर्जुनी-मोरगाव येथे देण्यात आले आहे. जि.प. हायस्कूल परसवाडा येथील आर.टी.बिसेन यांना जि.प. हायस्कूलकरटी-बुज येथे देण्यात आले.
जि.प. हायस्कूल आमगाव येथील सौ. एस.एस. कटकवार यांना जि.प. हायस्कूल बनाथर येथे, जि.प. हायस्कूल आमगाव येथील एल.एच. पटले यांना जि.प. हायस्कूल एकोडी (दांडेगाव), जि.प. हायस्कूल गोरेगाव येथील ए.वाय. खान यांना जि.प. हायस्कूल सडक-अर्जुनी येथे, सडक-अर्जुनी येथील आर.एफ.सिंगणजुडे यांना जि.प. हायस्कूल साखरीटोला, जि.प. हायस्कूल काटी येथील सौ. के.एल. पुराम यांना जि.प. हायस्कूल दवनीवाडा येथे पदोन्नतीवर बदली देण्यात आली. सदर बदली मंगळवारी करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)