सात दुचाकी गाड्या जप्त

By Admin | Updated: July 12, 2014 23:42 IST2014-07-12T23:42:29+5:302014-07-12T23:42:29+5:30

जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत दुचाकी चोरी होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. या दुचाकी चोरट्यांमुळे पोलीस त्रस्त होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शोधमोहीम राबवून तिघांजवळून

Seven bicycle trains seized | सात दुचाकी गाड्या जप्त

सात दुचाकी गाड्या जप्त

तिघांना अटक : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
गोंदिया : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत दुचाकी चोरी होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. या दुचाकी चोरट्यांमुळे पोलीस त्रस्त होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शोधमोहीम राबवून तिघांजवळून सात दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई मंगळवारी अर्जुनी/मोरगाव तालुक्यात करण्यात आली.
मागील पाच-सहा महिन्यांपासून जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत. या घटनांना घेऊन गंभीर झालेले पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना शोध मोहीम राबविण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक सुरेश भोयर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना या मोटारसायकल चोरट्यांचा पर्दाफास करण्यासाठी शोध मोहीम राबविली. मंगळवारी (दि.८) रोजी अर्जुनी/मोरगाव तालुक्यात शोध मोहीम राबवित असताना एक गोपनिय माहिती पोलिसांच्या हातात आली.
धाबेटेकडी ग्राम पंचायत समोर मोटार सायकल एम.एच.३५/टी.२०३९ वर आरोपी सुभाष उर्फ गिजऱ्या धनीराम डोंगरवार (२६) व अमोल उर्फ रघुभाई संजय गजभिये (२४) रा. नवेगावबांध हे दोघेही संशयास्पद स्थितीत मिळून आले. त्यांना विचारपूस केल्यावर त्या दोघांनी किशोर भीकारी जांभूळकर (४२) रा. धाबेटेकडी याची माहिती दिली. त्याने चोरीच्या अनेक मोटार सायकल लपवून ठेवल्याची माहिती दिली. त्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर विविध प्रकारच्या सात मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलमध्ये एम.एच.३१/डीई १३०६, एम.एच.३१/डीई ७१६२, एम.एच.३१/डीई २६१७, एम.एच.३१/डी.डब्ल्यू.७०८८, एम.एच.३५/टी२०३९,एम.पी.२०/ए.६०३८, एम.एच.३५/ई.५९८२ या मोटारसायकल आहेत. या प्रकरणात या तिघांना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक सुरेश भोयर यांचञया मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नावडकर, हवालदार अर्जुन कावळे, शंकर साठवणे, संतोष काळे, अजय सव्वालाखे, तुलसीदास लुटे, नितीन जाधव, भुवनलाल देशमुख, रेखलाल गौतम, धनंजय शेंडे, विनय शेंडे, लांजेवार सयाम यांनी केली.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Seven bicycle trains seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.