शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
2
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
3
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
4
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
5
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
6
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
7
गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?
8
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
9
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
10
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
11
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
12
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
13
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
14
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
15
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
16
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
17
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
18
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
19
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
20
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांची सेवा हीच खरी सेवा

By admin | Updated: December 8, 2014 22:36 IST

मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमी व दिशा संस्थानची विविध सामाजिक कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका राहते. यात हृदयरोग व अपंगांचे शिबीर, सामुहिक विवाह सोहळा यासारख्या महत्वपूर्ण उपक्रमांचा समावेश आहे.

राजेंद्र जैन : ८५७ अपंगांना साहित्य वाटप
गोंदिया : मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमी व दिशा संस्थानची विविध सामाजिक कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका राहते. यात हृदयरोग व अपंगांचे शिबीर, सामुहिक विवाह सोहळा यासारख्या महत्वपूर्ण उपक्रमांचा समावेश आहे. शिवाय संस्था लोकांच्या मदतीसाठी नेहमीच प्रयत्नरत राहते. मात्र अपंगांची सेवा हीच खरी सेवा आहे. माजी मंत्री प्रफुल पटेल व अ‍ॅकेडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल यांचीही हीच विचारधारा असल्याने भविष्यात असे कार्यक्रम घेण्यासाठी प्रयत्न घेतले जाईल असे प्रतिपादन आमदार राजेंद्र जैन यांनी केले. मनोहरभाई अ‍ॅकेडमी, दिशा संस्था, एल्मिको व ओएनजीसीच्या संयुक्त वतीने ८ डिसंबर रोजी मनोहरभाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालयात आयोजित अपंगांच्या साहित्य वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाला दिशा कुटीरचे संस्थापक डॉ. देवाशिष चॅटर्जी, डॉ. यादव कुदळे, एल्मिकोचे उप व्यवस्थापक राजेश दुबे, आर.एस.दास, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, शहर अध्यक्ष शिव शर्मा, महामंत्री मनोहर चंद्रिकापुरे,जिल्हा परिषद सदस्य राजलक्ष्मी तुरकर, गंगाधर परशुरामकर, अभियांत्रीकी महाविद्यालयाचे प्राचार्य एस.एस. राठोड व अन्य उपस्थित होते.
पाहुण्यांच्या हस्ते मनोहरभाई पटेल यांच्या छायाचित्राला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी दिशा संस्थेचे अध्यक्ष डॉ. चॅटर्जी यांनी, अ‍ॅकेडमी व दिशा संस्थेच्या माध्यमातून माजी मंत्री पटेल यांच्या मार्गदर्शनात असे उपक्रम सतत घेतले जाणार असल्याचे मत आपल्या प्रास्तावीकातून मांडले. तर एल्मिको चे उप व्यवस्थापक दुबे यांनी, अ‍ॅकेडमी, दिशा संस्था व ओएनजीसीच्या सहकार्याने हे कार्यक्रम यशस्वी होत असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात निवड करण्यात आलेल्या ८५७ अपंगांना कृत्रिम हात, पाय, अन्य अवयव, केलीपर्स, ट्रायसिकल, व्हील चेयर्स, कर्णयंत्र, स्टीक्स व अन्य साहित्यांचे वाटप करण्यात आले.
यात मतिमंदांसाठी अत्यंत उपयोगी सी.पी. चेयर व खऱ्या हातासारख्या उपयोगात येणाऱ्या कृत्रिम हाताचा समावेश होता.
या कार्यक्रमाचे संचालन रवी मुंदडा यांनी केले. आभार प्राचार्य डॉ. राठोड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. लता जैन, डॉ. संजय भगत, डॉ. चंद्रशेखर राणा, अखिलेंद्र मौर्य, शरद बिल्लोरे, विवेक गुप्ता, प्रा. देवेंद्र पांडे, प्रा. जगदीश अग्रवाल, प्रा. हितेश जोशी, प्राचार्य मृत्यूंजय सिंग, राजकुमार जैन, अस्सु दवे, हरीचंद मोटवानी, नानु मुदलीयार, विनोद अग्रवाल, दयानंद कटरे, कुमार पलन, राकेश गुप्ता आदिंनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)