शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हिस रोड देत आहे अपघाताला आमंत्रण

By admin | Updated: November 15, 2014 22:50 IST

शहरातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा च्या चौपदरीकरणाच्या वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बनविण्यात आलेल्या सर्वीस रोडकडे प्रशासन व अशोका बिल्डकॉन कंपनीचे दुर्लक्ष

देवरी : शहरातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा च्या चौपदरीकरणाच्या वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बनविण्यात आलेल्या सर्वीस रोडकडे प्रशासन व अशोका बिल्डकॉन कंपनीचे दुर्लक्ष असल्याने हा मार्ग अपघाताला आमंत्रण देत आहे. सविस्तर असे की, राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदीकरणाच्या वेळी सात मीटरचा सर्वीस रोड रस्त्याच्या दोन्ही बाजूला बनविण्यात आला. सर्वीस रोड निकृष्ट दर्जाचा बनविण्यात आल्यामुळे जागोजागी खड्डे पडले आहेत. तसेच हा मार्ग अतिक्रमणाने व्याप्त असल्याने या मार्गावरून चारचाकी वाहन नेण्यास चालकांना खूप त्रास घ्यावा लागतो. तसेच अशोक कंपनीद्वारे महामार्गावरील पाणी नाली मध्ये जाण्याकरिता जागोजागी हा मार्ग खोदून ठेवण्यात आलेला आहे. परंतू त्यावर डांबरीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे दुचाकी वाहन चालकांचा नेहमी अपघात होत असतो. बसस्थानकापासून ते तहसील कार्यालयापर्यंत मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला बनविण्यात आलेल्या सर्वीस रोडवर काही फुटपाथ दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. तर बऱ्याच ठिकाणी दिवसभर वाहनं उभी राहत असल्याने सर्वीस रोडची रूंदी कमी झाली असून दुचाकी वाहन चालक तसेच पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे. कित्येक ठिकाणी या रस्त्याला लागून कचऱ्याचे ढीग लागले आहेत. कंपनी कडे या मार्गाच्या देखभालीकरिता २० वर्षाचा करार करण्यात आला आहे. परंतू कंपनीचे अधिकारी म्हणतात की हे आमचे काम नसून ग्राम पंचायतची जबाबदारी आहे. मागील दोन वर्षांपूर्वी मोठमोठी दुकाने तोडून अतिक्रमण हटविण्यात आले व सर्वीस रोड तयार करण्यात आले. परंतू अद्याप या रस्त्यावरील विद्युत खांब हटविण्यात आले नाही. ग्रामवासीयांनी यापुर्वी सुद्धा सर्वीस रोडवरील समस्या दूर करण्याची मागणी केली होती. पण याकडे दुर्लक्षच करण्यात आले. यावर मात्र देवरीवासीयांनी अशोका बिल्डकॉम कंपनी व प्रशासनाने त्वरीत लक्ष देण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)