Corona Virus in Gondia; गोंदिया जिल्ह्यात ६६ प्रवासी आणि ३२५ व्यक्तींचे अलगीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 19:51 IST2020-04-02T19:50:37+5:302020-04-02T19:51:02+5:30
विदेशातून आलेले ६६ प्रवासी व त्यांच्या संपर्कात आलेल्या ३२५ व्यक्ती वास्तव्याच्या ठिकाणी अलगीकरणामध्ये आहे.

Corona Virus in Gondia; गोंदिया जिल्ह्यात ६६ प्रवासी आणि ३२५ व्यक्तींचे अलगीकरण
ठळक मुद्दे३७ नमुने तपासणीसाठी पाठविले
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: कोरोना विषाणूच्या अनुषंगाने जिल्ह्यात २२४ प्रवासी विदेशातून प्रवास करून आले. या प्रवाशांच्या संपर्कात ९४५व्यक्ती आल्याचे आढळून आले आहे.त्या सर्वांचे अलगीकरण करण्यात आले होते. त्यापैकी १७८ प्रवाशांचा अलगीकरणाचा कालावधी संपलेला आहे.
विदेशातून आलेले ६६ प्रवासी व त्यांच्या संपर्कात आलेल्या ३२५ व्यक्ती वास्तव्याच्या ठिकाणी अलगीकरणामध्ये आहे. या सर्वांवर प्रशासनाची देखरेख आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या अनुषंगाने ३७ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. एक नमुना यापूर्वीच पॉझिटिव्ह आला आहे. शासकीय अलगीकरण कक्षात ३५ व्यक्ती उपचार घेत आहे.