सखींच्या कलागुणांची चुणूक

By Admin | Updated: August 27, 2015 02:07 IST2015-08-27T02:07:50+5:302015-08-27T02:07:50+5:30

लोकमत सखी मंच व जेसीआय कृती यांच्या संयुक्त विद्यमाने कटंगी येथे झालेल्या दोन दिवशीय २२ व २३ आॅगस्ट रोजी श्रावण मेळाव्यात महिलांनी मोठी गर्दी केली.

Selective art pieces | सखींच्या कलागुणांची चुणूक

सखींच्या कलागुणांची चुणूक

गोंदिया : लोकमत सखी मंच व जेसीआय कृती यांच्या संयुक्त विद्यमाने कटंगी येथे झालेल्या दोन दिवशीय २२ व २३ आॅगस्ट रोजी श्रावण मेळाव्यात महिलांनी मोठी गर्दी केली. त्यात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
२२ आॅगस्ट रोजी कटंगी येथील मयूर लॉनमध्ये श्रावण मेळाव्याचे शुभारंभ एकता चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, कार्तिक चव्हाण, खुशबू टेंभरे, जेसीस अध्यक्ष भूमी बतवानी उपस्थित होते.
सदर मेळाव्यात कपडे, महिला आयटम, खेळणे, गेम्स, पापड, आचार याशिवाय टीव्हीएस स्कूटीद्वारे स्टॉल्स लावण्यात आले होते. मेळाव्याच्या पहिल्या दिवशी शिवलिंगाची सजावट करण्यात आली. वधू स्पर्धा व छत्री सजावट स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे निर्णायक म्हणून गर्ल्स महाविद्यालयातील होम एक्नॉमिक्सचे प्रमुख गोकुला ढोके, आज इन्स्टिट्युटच्या संचालिका मंजू कटरे, अनुराधा ब्युटीपार्लरच्या संचालिका अर्चना देशमुख यांनी कामकाज सांभाळले. सर्व निर्णायकांनी स्पर्धेत सहभागी स्पर्धकांची वाहवा केली.
संचालन नंदा राऊत यांनी केले. कार्यक्रमासाठी चंद्रकला, पूजा चव्हाण, प्रीती शर्मा, कल्पना शर्मा, गुंजन बतवानी आदींनी सहकार्य केले.
दुसऱ्या दिवशी २३ आॅगस्टला दीपा भौमिक यांच्या अध्यक्षतेखाली श्रावण मेळाव्याची सांगता करण्यात आली. याप्रसंगी अतिथी म्हणून अखिलेश सेठ, प्रसन्नजित संधू (कोरियोग्राफर), जेसीआयचे पुरूषोत्तम मोदी उपस्थित होते. महिलांच्या विविध स्पर्धाही झाल्या. स्पर्धा निर्णायक म्हणून गर्ल्स कॉलेजच्या गोकुला ढोके, मंजू कटरे, अर्चना देशमुख यांनी कामकाज सांभाळले.
संचालन सानिया खान यांनी केले. कार्यक्रमासाठी चंद्रकला, पूजा चव्हाण, प्रीती शर्मा, कल्पना शर्मा, गुंजन बतवानी आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: Selective art pieces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.