दोन मोबाईल टॉवर्सवर जप्तीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 22:00 IST2019-03-29T21:59:02+5:302019-03-29T22:00:00+5:30
नगर पंचायतने कर वसुलीसाठी धडक मोहिम सुरु केली असून येथील रिलायन्स क म्युनिकेशन प्रा.लि. सेंटर व रिलायन्स जिओ इन्फोकॉम प्रा.लि. सेंटर या दोन्ही टॉवर्सवर कर वसुलीकरिता बुधवारी (दि.२७) जप्तीची कारवाई करण्यात आली.

दोन मोबाईल टॉवर्सवर जप्तीची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : नगर पंचायतने कर वसुलीसाठी धडक मोहिम सुरु केली असून येथील रिलायन्स क म्युनिकेशन प्रा.लि. सेंटर व रिलायन्स जिओ इन्फोकॉम प्रा.लि. सेंटर या दोन्ही टॉवर्सवर कर वसुलीकरिता बुधवारी (दि.२७) जप्तीची कारवाई करण्यात आली.
नगर पंचायतकडून कर वसुली सुरू करण्यात आली असून आता फक्त २ दिवस उरले आहेत. शहरातील सर्व रहिवासी, व्यवसायी, शासकीय कार्यालय व मोबाईल टॉवर्स धारकांकडून मालमत्ता कर, व्यवसाय कर, पाणी कर अशा प्रकारच्या सर्व कर वसुलीची धडक मोहिम सुरु केली आहे.
रिलायन्स कम्युनिकेशन प्रा.लि. यांच्याकडे मागील १७-१८ या वित्तीय वर्षातील ४० हजार ३२० व चालू वर्षाचे ३६ हजार असे एकूण ७६ हजार ३२० रुपये आणि रिलायन्स जिओ इन्फोकॉम प्रा.लि.यांच्याकडे चालू वर्षाचे ३६ हजार रुपये व्यवसाय कर थकीत असल्याने नगर पंचायतने जप्तीची कारवाई केली. ही कारवाई मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी विरेंद्र आचले, पाणी पुरवठा अभियंता सचिन मेश्राम, सहायक लिपीक वामन फुन्ने आणि रोजगार सेवक यावलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या कारवाईमुळे शहरातील सर्व कर धारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.