जंगलात लपविलेला रेतीचा साठा जप्त

By Admin | Updated: November 5, 2016 01:17 IST2016-11-05T01:17:28+5:302016-11-05T01:17:28+5:30

दिवाळीच्या सणाला महसूल अधिकारी सुट्टीवर गेल्याचे पाहून आमगावातील रेती माफीयांनी दिवाळीच्या दिवशी रात्रभर नदीतील रेती चोरून

The seized siege seized in the forest | जंगलात लपविलेला रेतीचा साठा जप्त

जंगलात लपविलेला रेतीचा साठा जप्त

दिवाळीच्या रात्री रेती चोरी : आठ ठिकाणातील साठ्यांवर धाड
आमगाव : दिवाळीच्या सणाला महसूल अधिकारी सुट्टीवर गेल्याचे पाहून आमगावातील रेती माफीयांनी दिवाळीच्या दिवशी रात्रभर नदीतील रेती चोरून शहरालगतच्या जंगल परिसरात लपवून ठेवला. घरबांधणी करणाऱ्यांच्या मागणीनुसार त्या साठ्यातील रेती त्यांना पुरविली जात होती. गुरूवारच्या रात्री तहसीलदार साहेबराव राठोड यांनी कर्मचाऱ्यांना घेऊन ही कारवाई केली.
आमगाव तालुक्यात ४०० ट्रॅक्टर आहेत. त्यापैकी १०० ट्रॅक्टर हे रेती वाहतूकीचे काम करतात. मागील अनेक दिवसापासून महसूल अधिकाऱ्यांनी मोकाट सुटलेल्या रेती माफीयांना आवळल्याने मागील अनेक दिवसापासून रेती मिळणे बंद झाले होते. विटा सिमेंटचे कामही बंद पडले होते. यामुळे महसूल प्रशासनाविरूध्द काही ट्रॅक्टर चालकांचा आक्रोशही होता. तरीही अधिकाऱ्यांची नजर चुकवून काही ट्रॅक्टर चालक रेतीची चोरी करून विकत होते. दिवाळीच्या सणाला अधिकारी स्वगावी दिवाळी साजरी करायला जाणार यासाठी रेतीमाफीयांनी लक्ष्मी पूजनाच्या रात्रीच नदीतील रेती काढून मागणी केलेल्या लोकांच्या घरी टाकली. तसेच गावालगतच्या जंगल परिसरात रेतीचे ढिगारे करून ठेवले होते. याची भनक लागल्यावर तहसीलदार राठोड यांनी गुरूवारी दोन डोजर, एक जेसीबी व चार ट्रॅक्टर लाऊन आमगाव, मोहनटोला जंगल परिसरात साठवून ठेवलेल्या आठ ठिकाणी धाड घालून ८० ब्रास रेती जप्त करून तहसील कार्यालयात आणले. ती रेती कुणी आणून ठेवली यासंदर्भात कुणाकडून माहिती मिळत नाही. मोहनटोला, सेमोदेमो पहाडी, सालेकसा रोड, वाघनदी काठावर, राईस मील समोर अश्या आठ ठिकाणातून रेतीचा साठा जप्त करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)

५६ ब्रास रेतीचा लिलाव
मुंडीपार येथील ५६ ब्रास रेतीचा साठा करून ठेवला होता. याची माहिती तहसीलदार साहेबराव राठोड यांना २० आॅक्टोबर रोजी लागताच त्यांनी तो साठा जप्त करून ८५ हजारात २७ आॅक्टोबरला ती रेती विक्री केली आहे. रेती चोरणाऱ्या ट्रॅक्टरला पकडल्यास त्या वाहनावर १५ हजार ४०० रूपयाचा दंड आकारण्यात येत आहे.

Web Title: The seized siege seized in the forest