शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
4
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
5
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
6
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
9
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
10
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
11
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
12
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
13
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
14
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
15
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
16
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
17
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
18
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
19
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
20
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं

सुरक्षा समितीने गावबंदीसाठी कसली कंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 5:00 AM

जवळील ग्राम करांडली येथील एका व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने गावालगत असणाऱ्या बोेंडगाव (सुरबन), सुरबन, जरुघाटा, खोकरी, दिनकरनगर, केळवद, तुकुमनारायण या ७ गावांना प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून त्या गावांच्या सीमा बंद करुन पोलीस बंदोबस्त लावण्यात आले आहे.

ठळक मुद्देमुख्यद्वार केले प्रवेशासाठी बंद : सुरक्षा समितीतील तरूणांचा कडक बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : येथून ४ किमी. अंतरावरील ग्राम करांडली येथे एक व्यक्ती कोरोना बाधीत आढळल्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने करांडली जवळील बोंडगाव (सुरबन), सुरबन, जरुघाटा, खोकरी, दिनकरनगर, केळवद, तुकुमनारायण ही गावे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत केले आहे. त्या गावातील पूर्णपणे आवागमन बंद करुन पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शासनाच्या पावलावर पाऊल टाकत येथील कोरोना निवारण सुरक्षा समितीने त्वरीत बैठक बोलावून गावबंदीचा निर्णय घेऊन अंमलबजावणी सुद्धा करण्यात आली आहे.जवळील ग्राम करांडली येथील एका व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने गावालगत असणाऱ्या बोेंडगाव (सुरबन), सुरबन, जरुघाटा, खोकरी, दिनकरनगर, केळवद, तुकुमनारायण या ७ गावांना प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून त्या गावांच्या सीमा बंद करुन पोलीस बंदोबस्त लावण्यात आले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत कोरोना निवारण सुरक्षा समितीने त्वरीत बैठक बोलावून स्वयंस्फूर्तीने गावबंदीचा निर्णय घेऊन २४ तास कोरोना निवारण सुरक्षा समितीच्या सदस्यांना आळीपाळीने पहारा देण्यात यावे असे ठरविण्यात आले. या परिसरातील केशोरी हे गाव बाजारपेठ असल्यामुळे दिवसभर इतर गावातील लोकांचे आवागमन असते. कोरोना विषाणूचा शिरकाव होण्याच्या भितीने सतर्कता म्हणून बाहेर गावातील व्यक्तींसाठी गावबंदी करुन बाहेरगावच्या व्यावसायीकांची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.मूळनिवासी व्यावसायीकांनी आवश्यक वस्तूच्या विक्रीसाठी दुकाने सुरु ठेवण्याची वेळ सकाळी ८ ते दुपारी २ वाजतापर्यंत निश्चित करण्यात आली आहे. समितीच्या सदस्यांनी गावच्या चारही बाजूचे रस्ते लाकडे आडवी टाकून बंद केले आहेत. त्यावर पोलीस कर्मचाऱ्यांसारखे २४ तास कोरोना निवारण सुरक्षा समितीचे सदस्य पहारा देत आहेत. अतिआवश्यक कामाचे स्वरुप पाहून सवलत देण्याचा निर्णय समितीने घेतला असून बाहेर गावातील कोणत्याही व्यक्तीला गावबंदी करण्यात आली आहे. सदर बंदीतून शासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेले आॅन ड्युटी अधिकारी-कर्मचारी ओळखपत्राचे आधारे आवश्यक तातडीचे वैद्यकीय कारणे वैद्यकीय सेवेशी संबंधीत खाजगी डॉक्टर, नर्स, मेडिकल स्टोर्स, पॅथालॉजीस्ट, रुग्णवाहिका, जीवनावश्यक वस्तूच्या सेवा पुरवठा करणारे व्यक्ती, जीवनावश्यक वस्तूंशी संबंधित सेवांना सुट देण्यात आली असल्याचे समितीचे प्रमुख हिरालाल पाटील शेंडे आणि पोलीस पाटील नानाजी पेंदाम यांनी सांगीतले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या