शहरं
Join us  
Trending Stories
1
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
2
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
3
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
4
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
5
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
6
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
7
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
8
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
9
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
10
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
11
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
12
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
13
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
14
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
15
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
16
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
17
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
18
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
19
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
20
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा

जिल्ह्यात स्क्रब टायफसचा रुग्ण आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 9:21 PM

विदर्भात स्क्रब टायफस आजाराने पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. नागपुरात या आजाराने आत्तापर्यंत तीन ते चार रुग्णांचा मृत्यु झाला आहे. यानंतर जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगाव सुरबन गावात स्क्रब टायफसचा एक रुग्ण आढळला असून त्याला उपचारासाठी नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देसंशयित रुग्णांचा शोध सुरू : आरोग्य केंद्रांना औषधाचा पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विदर्भात स्क्रब टायफस आजाराने पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. नागपुरात या आजाराने आत्तापर्यंत तीन ते चार रुग्णांचा मृत्यु झाला आहे. यानंतर जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगाव सुरबन गावात स्क्रब टायफसचा एक रुग्ण आढळला असून त्याला उपचारासाठी नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा आरोग्य विभागाने सुध्दा दुजोरा दिल्याने स्क्रब टायफस आजाराने जिल्ह्यात प्रवेश केल्याने जिल्हावासीयांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.बोंडगाव सुरबन येथील एका १७ वर्षीय मुलीला १५ दिवसांपूर्वी ताप आला होता. दरम्यान तिला डोखेदुखी, मळमळ, हातपाय दुखणे आदीचा त्रास होत असल्याची लक्षणे आढळली. त्यानंतर तिला गोठणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र तिथे काहीच निष्पन्न न झाल्याने तिला नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांकडे दुर्लक्ष केल्याने तिला ब्रम्हपुरी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिची प्रकृती सातत्याने खालावत असल्याने डॉक्टरांनी तिला नागपूर येथे दाखल करण्याचा सल्ला दिला. नागपूर येथे तिच्या रक्ताचे नमुने तपासणी केले असता तिला स्क्रब टायफस आजाराची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. सध्या तिच्यावर नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. सदर मुलीला स्क्रब टायफसची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर स्थानिक आरोग्य प्रशासनात खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाने तातडीने बोंडगाव सुरबन येथील नागरिकांच्या रक्ताचे नमुणे तपासण्यास सुरूवात केली आहे.जिल्हा आरोग्य विभागाला माहिती द्याजिल्ह्यात स्क्रब टायफसचा रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी संशयित रुग्णांची तपासणी मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. तसेच डॉक्सी सॉयक्लीन या स्क्रब टायफसवरील औषधांचा पुरवठा सर्व ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राने केला. या आजाराचा संशयिता रुग्ण आढळल्यास त्वरीत याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाला देण्याचे निर्देश दिले आहे.धानपिकांमुळे सर्वाधिक धोकागोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे उत्पादन घेतले जाते. स्क्रब टायफस हा आजार प्रामुख्याने धानपिकांवरील किटकांच्या चाव्यांमुळे होतो. त्यातच या आजाराने आता जिल्ह्यात शिरकाव केल्याने नागरिकांना काळजी घेण्याची गरज आहे. या आजाराची लक्षणे दिसताच वेळीच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून उपचार घ्यावा.जनजागृतीचा अभावस्क्रब टायफस आजाराने विदर्भात शिरकाव केल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात या आजाराविषयी जनजागृती मोहीम सुरू केली होती. तसेच आजाराची कोणती लक्षणे आहेत, नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी याची माहिती दिली. मात्र जिल्ह्यात जनजागृती मोहीमेचा अभाव दिसून आला.जिल्ह्यातील बोंडगाव सुरबन येथे स्क्रब टायफसचा एक रुग्ण आढळला असून त्याच्यावर नागपूर येथे उपचार सुरु आहे. या पार्श्वभुमिवर संशयीत रुग्ण तपासण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच सर्व आरोग्य केंद्राना डॉक्सी सॉयक्लीन या औषधाचा पुरवठा करण्यात आला असून उपाय योजना सुरू केल्या आहेत.- श्याम निमगडे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

टॅग्स :Healthआरोग्य