दैनिक व्यवहारातही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगिकार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST2019-12-24T05:00:00+5:302019-12-24T05:00:20+5:30

विज्ञान विषयाचे अध्ययन-अध्यापन अधिक प्रभावशाली व आकर्षक होण्यासाठी ज्या शैक्षणिक संसाधनांची आशक्यता असते, त्यांची उपलब्धता प्रत्येक शैक्षणिक संस्थांमध्ये असणे गरजेचे असते. यावर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार मुल्यांकन होणे तेवढेच महत्वाचे वाटते. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच आपल्या दैनंदिन व्यवहारात वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारावा असे प्रतिपादन माजी खासदार तथा शाळा संस्थापक डॉ.खुशाल बोपचे यांनी केले.

A scientific approach should also be adopted in daily practice | दैनिक व्यवहारातही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगिकार करावा

दैनिक व्यवहारातही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगिकार करावा

ठळक मुद्देबोपचे : तालुका विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : विज्ञान विषय अध्ययनात कोणत्याही काल्पनीक संकल्पनांना वाव नसतो. प्रत्येक घटनांना वैज्ञानिक आधाराची पाशर््वभूमी असते. त्यातून सत्यता प्राप्त होते. विज्ञान विषयाचे अध्ययन-अध्यापन अधिक प्रभावशाली व आकर्षक होण्यासाठी ज्या शैक्षणिक संसाधनांची आशक्यता असते, त्यांची उपलब्धता प्रत्येक शैक्षणिक संस्थांमध्ये असणे गरजेचे असते. यावर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार मुल्यांकन होणे तेवढेच महत्वाचे वाटते. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच आपल्या दैनंदिन व्यवहारात वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारावा असे प्रतिपादन माजी खासदार तथा शाळा संस्थापक डॉ.खुशाल बोपचे यांनी केले.
शिक्षण विभागाच्यावतीने तालुक्यातील ग्राम मोहगाव बु. येथील परशुराम विद्यालयात आयोजित तालुका विज्ञान प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी शुक्रवारी (दि.२०) अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन पंचायत समितीचे सभापती माधुरी टेंभरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी टी.बी.भेंडारकर, सरपंच हेमलता हरिणखेडे, मुख्याध्यापक बी.डब्लु.कटरे, बी.आर. सीचे गटसमन्वयक एस.बी.खोब्रागडे, केंद्रप्रमुख वाय.एल.रंहागडाले उपस्थित होते.
विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील विविध शाळांतील ६० प्रयोगांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन करण्यात आले. मुल्यांकन गोरेगांव येथील जगत विज्ञान महाविद्यालयाचे प्रा.डॉ.गजाधर भगत, डॉ.बाळकृष्ण परशुरामकर व डॉ.जे. आय.ठाकूर यांनी केले. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी भेंडारकर यांनी मांडले. संचालन विषयतज्ज्ञ सुनील ठाकुर यांनी केले. आभार विषयतज्ज्ञ ओमप्रकाश ठाकरे यांनी मानले. त्याचप्रकारे शनिवारी (दि.२१) पार पडलेल्या बक्षीस वितरण कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी भेंडारकर होते. मुख्य बक्षीस वितरक म्हणून मुख्याध्यापक कटरे तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख बी.बी.चौधरी उपस्थित होते. प्रास्ताविक विषयतज्ज्ञ भाष्कर बहेकार यांनी मांडले. संचालन विषयतज्ज्ञ ओमप्रकाश ठाकरे यांनी केले. आभार गटसमन्वयक एस.बी.खोब्रागडे यांनी मानले. प्रदर्शनीसाठी बी.आर.सी. गोरेगांव येथील सर्व विषयतज्ज्ञ, विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

यांनी मारली बाजी
विज्ञान प्रदर्शनीत प्राथमिक विद्यार्थी गटातून प्रथम क्रमांक मॉडेल कान्व्हेंटचा विद्यार्थी खुशाल चौधरी, द्वितिय क्रमांक शहीद जान्या-तिम्या जिल्हा परिषद हायस्कूलचा प्रणय हुमणे व तृतीय क्रमांक शहारवानी येथील स्व.ब्रिजलाल कटरे हायस्कूलचा अंकित पटले याने पटकाविला. माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक शहीद जान्या-तिम्या जिल्हा परिषद हायस्कूलचा महेंद्र चौरागडे, द्वितीय क्रमांक सोनी येथील एम.आय.पटेल हायस्कूलची विद्यार्थिनी उषा पटले व तृतीय क्रमांक मोहगाव येथील परशुराम विद्यालयातील विद्यार्थिनी भाग्यश्री पटले हिने पटकाविला. प्राथमिक शिक्षक गटातून ग्राम सिलेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहायक शिक्षक एस.आर.साबळे, माध्यमिक शिक्षक गटातून ग्राम मोहगाव येथील परशुराम विद्यालयातील भारती खेमेंद्र कटरे तसेच प्रयोगशाळा सहायक गटातून ग्राम चोपा येथील रविंद्र विद्यालयातील प्रयोगशाळा सहायक एन. एम. भड यांनी तयार केलेल्या प्रतिकृतींची निवड करण्यात आली.

Web Title: A scientific approach should also be adopted in daily practice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.