शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
4
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
5
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
6
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
7
दर्यापुरात टोळक्याचा धुमाकूळ; अमरावती मार्गावर चालत्या वाहनांवर दगडफेक
8
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
9
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
10
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
11
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
12
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
13
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
14
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
15
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
16
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
17
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
18
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
19
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
20
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 

शाळांकडून पालकांना ‘शिक्षण शुल्कात सवलत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2021 5:00 AM

मागील वर्षापासून कोरोनाने कहर केला असून, अद्यापही जनजीवन पूर्वपदावर आलेले नाही. कोरोनाने देशात लाखो लोकांचा जीव घेतला आहे. मात्र त्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे, लाखो लोकांच्या हातचा रोजगार हिरावून नेल्याने त्यांना आता दिवस काढणेही कठीण झाले आहे. कोरोनापूर्वी होती त्या आर्थिक स्थितीच्या आधारावर अशा कुटुंबांनी आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी खासगी शाळांमध्ये टाकले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लाखो लोकांचा जीव घेणाऱ्या व हातचा रोजगार हिसकावून घेणाऱ्या कोरोनामुळे आजही कित्येक कुटुंबीयांना जीवन जगणे कठीण झाले आहे. मात्र चांगले शिक्षण मिळावे यासाठी ते पाल्यांना खासगी शाळेत पाठवीत आहेत. त्यांच्या या मजबुरीचा फायदा घेत असून, अशा या कठीण परिस्थितीत ही पालकांकडून फी वसूल करण्यासाठी शाळांकडून पालकांना ‘शिक्षण शुल्कात सवलत’ दिली जात आहे. यामध्ये ठरवून दिलेल्या मुदतीत फी भरल्यास २५ टक्के सूट दिली जाणार असून, अन्यथा पूर्ण फी भरावी लागणार असल्याचे स्पष्ट सांगितले जात आहे. मागील वर्षापासून कोरोनाने कहर केला असून, अद्यापही जनजीवन पूर्वपदावर आलेले नाही. कोरोनाने देशात लाखो लोकांचा जीव घेतला आहे. मात्र त्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे, लाखो लोकांच्या हातचा रोजगार हिरावून नेल्याने त्यांना आता दिवस काढणेही कठीण झाले आहे. कोरोनापूर्वी होती त्या आर्थिक स्थितीच्या आधारावर अशा कुटुंबांनी आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी खासगी शाळांमध्ये टाकले होते. मात्र आता रोजगार हिरावल्यानंतर व कोरोनामुळे निर्माण झालेल्या अन्य अडचणींमुळे कित्येकांना आता पूर्ण फी भरणे शक्य नसल्याचीही वास्तविकता आहे. मात्र अशा या कठीण समयीही खासगी शाळांकडून फी वसुलीसाठी नवनवे प्रयोग अमलात आणले जात आहेत. त्यात आता शाळांकडून फी वसुलीसाठी पाल्यांना डिस्काऊंट ऑफर दिली जात आहे. यात शाळांनी ठरवून दिलेल्या तारखेपर्यंत पाल्यांनी फी भरल्यास त्यांना २५ टक्के सूट दिली जाणार आहे. अन्यथा तारीख निघाल्यावर मात्र पूर्ण फी भरावी लागणार, अशी ही ऑफर आहे. एकंदर शाळांकडून फक्त फी वसुलीवर लक्ष केंद्रित केले जात असून, त्यांना परिस्थितीशी काहीच घेणे-देणे नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. १५ टक्के सूटला बगल - राज्य शासनाने खासगी शाळांमधील फीमध्ये १५ टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शाळांना आता १५ टक्के सूट द्यावी लागणार आहे. मात्र शाळांकडून याबाबत काहीच बोलले जात नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. जास्तीत जास्त फी वसुलीसाठी शाळांचे प्रयत्न सुरू आहे. यासाठी आता नवनवे प्रयोग अमलात आणले जात असून, अशा ऑफरचे आमिष दिले जात असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. पालकांना पाठविले जात आहे मॅसेज - जिल्ह्यातील कित्येक शाळांनी सध्या फी वसुलीसाठी अशा वेगवेगळ्या ऑफर आणल्या असून, त्याबाबत पालकांना मॅसेज पाठविले जात आहेत. पालकांच्या परिस्थितीचे शाळांना सोयरसुतक नसून त्यांना फक्त पैसा हवा आहे. खेदाची बाब म्हणजे, अशा या कठीण समयी शासन-प्रशासन वा लोकप्रतिनिधीही काहीच करायला आता पुढे येत नसल्याचे दिसत आहे.

 

टॅग्स :Schoolशाळा