जिल्ह्यातील शाळा सुरू, मात्र महाविद्यालये बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:44 IST2021-02-05T07:44:14+5:302021-02-05T07:44:14+5:30
........ एकूण महाविद्यालय : ४० एकूण विद्यार्थी संख्या : २५ हजार ..... चाळीस हजार विद्यार्थी प्रतीक्षेत जिल्ह्यात एकूण २७६ ...

जिल्ह्यातील शाळा सुरू, मात्र महाविद्यालये बंदच
........
एकूण महाविद्यालय : ४०
एकूण विद्यार्थी संख्या : २५ हजार
.....
चाळीस हजार विद्यार्थी प्रतीक्षेत
जिल्ह्यात एकूण २७६ महाविद्यालये आहेत; मात्र त्यात बारावीनंतरची एकूण ४० महाविद्यालये असून, त्यात ४० हजार विद्यार्थी आहेत. मागील वर्षी कोराेनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यात शाळा, महाविद्यालय बंद करण्यात आले. ती अद्यापही पूर्ववत करण्यात आली नाही. तर अलीकडे पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाल्याने आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनासुद्धा महाविद्यालये उघडण्याची आस लागली आहे.
.....
कोट
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमी मागील ११ महिन्यांपासून महाविद्यालये बंद आहेत. कोविड परिस्थितीत सुधारणा होत असताना हळूहळू दारुची दुकाने, मॉल, सिनेमागृह, परिवहन सेवा व राज्यातील पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत; परंतु महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होेत आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आभासी पद्धतीचा उपयोग होत असला तरी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे महाविद्यालय त्वरित सुरू करावे.
- अतुल कावडे, नगर मंत्री अखिल भारतीय विद्यार्थी परिषद.
.....
कोरोनानंतर आता परिस्थिती बऱ्यापैकी पूर्वपदावर आली आहे. त्यामुळे शासनाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सर्व बाबींचा विचार करून महाविद्यालये त्वरित सुरू करावी.
- केतन तुरकर, अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस.
.......
मागील ११ महिन्यांपासून महाविद्यालये बंद आहेत. ऑनलाईन क्लासेस सुरु असले तरी प्रत्यक्षात महाविद्यालयात जावून शिक्षण घेण्याचा आनंद वेगळाच आहे. केव्हा एकदा महाविद्यालय सुरु होते आणि महाविद्यालयात जातो याची मला आतुरता लागली आहे.
- सुनंदा हुकरे,विद्यार्थिनी
.....
शासनाने आता पाचवी ते बारावीपर्यंत वर्ग सुरु आहे. याच धर्तीवर आता महाविद्यालय सुरु करुन विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे. पाचव्या वर्गातील मुले स्वत:ची काळजी घेवू शकतात तर महाविद्यालयीन विद्यार्थी सुध्दा स्वत:ची निश्चित काळजी घेतील.
- मोहीत फुंडे विद्यार्थी.
.....