शाळेला कुलूप ठोकणार
By Admin | Updated: June 25, 2014 23:51 IST2014-06-25T23:51:13+5:302014-06-25T23:51:13+5:30
येथील शहीद जाम्या-तिम्या जिल्हा परिषद हायस्कूल येथे गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांची पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्यात यावे अशी मागणी वारंवार करुनही शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात आली नाही.

शाळेला कुलूप ठोकणार
व्यवस्थापन समितीचा इशारा : मुकाअ यांना निवेदन
गोरेगाव : येथील शहीद जाम्या-तिम्या जिल्हा परिषद हायस्कूल येथे गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांची पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्यात यावे अशी मागणी वारंवार करुनही शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात आली नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याचा निषेध म्हणून उद्या (दि. २६) रोजी शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा शाळा व्यवस्थापन समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
येथील शहीद जाम्या-तिम्या जिल्हा परिषद हायस्कुलमध्ये पाचवी ते बारावीचे वर्ग भरतात. यातील मुख्याध्यापकाचे एक पद रिक्त आहे. पर्यवेक्षक एक, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक (विज्ञान) तीन, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक (कला) दोन, उच्च माध्यमिक शिक्षक दोन पद गेल्या अनेक वर्षापासून रिक्त आहे. मात्र संबंधीत प्रशासनाने रिक्त पद भरले नाही. यामुळे गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून त्यामुळे पालकवर्गात कमालीचा असंतोष आहे.
करिता शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा शाळा व्यवस्थापन समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला असल्यामुळे शिक्षण विभागाने चांगलीच धास्ती घेतल्याचे समजते. (तालुका प्रतिनिधी)