लोकसहभागातून शाळेच्या भिंती झाल्या बोलक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:35 IST2021-07-07T04:35:51+5:302021-07-07T04:35:51+5:30

मुंडीकोटा : कोरोना संक्रमण काळात अनेक उपक्रम राबविण्यात अनेकांची पिछेहाट झाली, मात्र उमेदीचा मार्ग न सोडता तिरोडा तालुक्यातील येडामाकोट ...

The school walls were built through public participation | लोकसहभागातून शाळेच्या भिंती झाल्या बोलक्या

लोकसहभागातून शाळेच्या भिंती झाल्या बोलक्या

मुंडीकोटा : कोरोना संक्रमण काळात अनेक उपक्रम राबविण्यात अनेकांची पिछेहाट झाली, मात्र उमेदीचा मार्ग न सोडता तिरोडा तालुक्यातील येडामाकोट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापकासह शिक्षकांनी शाळेत अनेक उपक्रम राबवून इतरांसमोर नवनिर्मितीचा संकल्प सोडला.

नवीन शैक्षणिक सत्राला प्रारंभ झाला असून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा ऑनलाइनच सुरू आहेत. विद्यार्थी प्रत्यक्षात शाळेत हजेरी लावत नसले तरी शिक्षक शाळेत नियमित उपस्थिती लावत आहे. शाळेचा परिसर स्वच्छ सुंदर दिसावा, शाळेच्या परिसरातील वातावरण आनंदीमय व प्रफुल्लित राहावे यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षक प्रयत्न करीत आहे. मुख्याध्यापक राजू चामट यांनी शाळेत परसबाग व फुलांची बाग तयार केली आहे. सरपंच राजू कापसे यांच्यासह सहायक शिक्षक व ग्रामस्थांच्या मदतीने हे उपक्रम राबविण्यात आले. थोड्याच कालावधीत शाळा परिसर हिरवागार झाला आहे. यासाठी शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांसह सरपंच, सहायक शिक्षक, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी, मदतनीस यांचे सुध्दा सहकार्य मिळत आहे. लोकसहभागातून शाळेचा कायापालट केल्याने येडामाकोट शाळा तिरोडा तालुक्यात आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

.......

सरपंचासह अनेकांनी केली मदत

येडामाकोट शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय व्यवस्थापन समितीने पुढाकार घेतला आहे. सरपंचाकडून शाळेला पाणी शुध्दीकरण यंत्र भेट देण्यात आला. शिक्षिका नंदनवार यांनी विद्यार्थ्यांसाठी शाळेला प्रिंटर भेट दिला. विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा भिंतीचे बांधकाम करण्यात आले. शाळेची रंगरगोटी करून शाळेचा परिसर सुशोभित करण्यात आला. शाळेच्या भिंती बोलक्या झाल्या. या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वाचनालय तसेच वस्तू भंडार उघडण्यात आले. शाळेला लोखंडी गेट लावण्यात आले. परसबाग व फुलांचा बगिच्याला पाण्यासाठी बोअरवेलची सुध्दा व्यवस्था करण्यात आली आहे.

..........

विद्यार्थ्यांसाठी बचत बँक

विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच बचतीची सवय लागावी यासाठी शाळेत बचत बँक उघडण्यात आली आहे. पालकांकडून विद्यार्थ्यांना खाऊसाठी मिळणाऱ्या पैशांची विद्यार्थी या बचत करतात. यामुळे विद्यार्थ्यांना बँकेच्या व्यवहाराची सुध्दा माहिती मिळण्यास मदत होत आहे. शाळा परिसर स्वच्छ, सुंदर व आकर्षक दिसावा यासाठी परसबाग तयार करण्यात आली आहे. यासाठी मुख्याध्यापक राजू चामट, सरपंच राजू कापसे, सहायक शिक्षक बारसागडे, ढबाले, शिक्षिका नंदनवार, मदतनीस, परिचर मळकाम आदी सहकार्य करीत आहे.

Web Title: The school walls were built through public participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.