शाळा, महाविद्यालय इमारतींना फुटला पाझर
By Admin | Updated: August 8, 2014 00:03 IST2014-08-08T00:03:50+5:302014-08-08T00:03:50+5:30
नर्सरी ते महाविद्यालय शिक्षणाचे माहेरघर असले तरी विद्यार्थ्यांच्या मुलभूत सुविधांना येथेच बगल दिली जात आहे. त्यामुळे जर्जर झालेल्या इमारतींना पावसात पाझर फुटल्यामुळे विद्यार्थी पाण्याखाली

शाळा, महाविद्यालय इमारतींना फुटला पाझर
यशवंत मानकर - आमगाव
नर्सरी ते महाविद्यालय शिक्षणाचे माहेरघर असले तरी विद्यार्थ्यांच्या मुलभूत सुविधांना येथेच बगल दिली जात आहे. त्यामुळे जर्जर झालेल्या इमारतींना पावसात पाझर फुटल्यामुळे विद्यार्थी पाण्याखाली शिक्षण घेत असल्याचे चित्र असून त्यांचा जीव मात्र धोक्यात अडकला आहे.
तालुक्यात जिल्हा परिषद व खाजगी अनुदानीत व कायम विना अनुदानीत शाळा आणि महाविद्यालय शिक्षणाच्या नावावर शैक्षणिक पंढरी गणल्या जात आहे. परंतु शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शिक्षण संस्था धोक्याची ठरत आहे.
तालुक्यात नर्सरी ते महाविद्यालयातुन शिक्षण देणाऱ्या अनुदानित व कायम अनुदानित १५१ शाळा अस्त्विात आहेत. या शाळांमधून हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अनेक शाळा अनुदानीत आहेत तर कायम अनुदानित असलेल्या शाळांना विद्यार्थ्यांची स्पर्धेची लाट लागली आहे. याच लाटेवर त्यांनी पालकांकडून नियमापेक्षा अधिक शैक्षणिक शुल्क आकारले आहे. यात नर्सरी ते महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी पाझर फुटलेल्या इमारतींमध्ये धोक्याचे शिक्षण अध्यापन करित आहेत.
जिल्हा परिषद अंतर्गत अनेक शाळा सर्व शिक्षा अभियान अंतर्गत निर्माण झालेल्या इमारतीत शिक्षण घेत आहेत. परंतु अद्यापही सर्व शाळा नविन इमारत बांधकामाने परिपूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी कौलारू पडक्या इमारतीत शिक्षण घेण्यास हतबल आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत शाळांतील अनेक इमारती नव्याने बांधकाम करण्यात आले. परंतु गुणवत्तापूर्ण काम न झाल्यामुळे शाळा इमारतींना भेगा पडल्या आहेत. विद्यार्थी बसत असलेल्या वर्ग खोल्यांमध्ये पावसाचे पाणी पाझरत असल्याने विद्यार्थ्यांना पावसाचे थेंबं मोजत अभ्यास करावा लागत आहे.
अनेक शाळांमध्ये हे दृष्य नवीन नाही. शाळा इमारतींना पाझर फुटत असल्याने व भिंतीना भेगा पडल्याने जर्जर अवस्था आहे. यासंबधी अनेक मुख्याध्यापकांनी प्रशासनाला सूचना दिली. परंतु अद्यापपर्यंत प्रशासनाने योग्य दखल घेतली नाही. त्यामुळे शाळा इमारत पावसाळ्यात पाझरत असल्याने विद्यार्थी मात्र पाण्याखाली आहेत.
तालुक्यातील शैक्षणिक पंढरीत खाजगी अनुदानीत शाळांचे एक छत्र वर्चस्व आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मुुलभूत सोर्इंच्या नावावर प्रलोभन देऊन विद्यार्थी व पालकांना आकर्षित करण्यात येते. परंतु इमारती मात्र पडक्या अवस्थेत किंवा जर्जर अवस्थेत आहेत. अनेक शाळांमध्ये कौलारू इमारतीत विद्यार्थी पावसाला हाक मारताना दिसतात. अनेक शाळांत अद्ययावत इमारत नसतानाही क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्याना शिक्षण दिले जात आहे. मात्र इमारत जर्जर असूनही दुरूस्तीकडे लक्ष घालण्यात येत नाही. त्यामुळे पावसाळ्यात विद्यार्थी पाणी पाझरत असलेल्या खोल्यांमध्ये शिक्षण घेत आहेत. खाजगी शाळा अनुदानापलिकडे शाळांच्या मुलभूत सोईकडे विशेष लक्ष देत नाहीत. शाळा परिक्षणापुरते शाळा अद्यावत करून शासनाची दिशाभूल करण्यात येते. परंतु या भूलथापाकडे प्रशासन लक्ष घालीत नाही. त्यामुळे या शाळांची अवस्था जैसे थे आहे. यात प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी संख्या सत्र २०१२-१३ मध्ये २४७९३ एवढी होती. शाळा परिसरात साचलेले पावसाचे पाणी, स्वच्छतेचा अभाव, स्वच्छतागृहाची घाण असते.