स्कूल बसला अपघात
By Admin | Updated: September 20, 2014 01:39 IST2014-09-20T01:39:55+5:302014-09-20T01:39:55+5:30
गोंदियातील सेंट झेवियर्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना

स्कूल बसला अपघात
सेंट झेवियर्सचे १३ विद्यार्थी जखमी : आमगाव-गोंदिया मार्गावरील घटना
आमगाव : गोंदियातील सेंट झेवियर्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना आमगावरून गोंदियाला आणत असलेल्या स्कूल बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्यावरून खाली उतरून झुडपात शिरली. यात १३ विद्यार्थी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी गोंदिया येथे दाखल करण्यात आले.
येथील सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या विविध ठिकाणाच्या विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत आणून परत घरी पोहोचवून देण्यासाठी शाळेने बससेवा सुरू केली. आहे. यात आमगाव तालुक्यातील अनेक विद्यार्थी दररोज बसने येतात. नेहमीप्रमाणे शुक्रवारी एक स्कूल (एमएच ३५/के-६९३) आमगाववरून सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन निघाली. गोंदिया-आमगाव मार्गावरील दहेगाव वळणावरून ही बस जात असताना बसेसची गती नियंत्रणात नसल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्त्यालगत शेतात शिरून अपघात झाला.
या १३ विद्यार्थी जखमी झाले. त्या विद्यार्थ्यांना तातडीने गोंदिया येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु पालकांनी व नागरिकांनी शाळा व्यवस्थापनाकडे जखमी विद्यार्थ्यांची चौकशी करण्यासाठी वारंवार दूरध्वनीवरून संपर्क केल्यावर उत्तर मिळत नसल्याचा अनुभव अनेकांना आला.
वेगाने चालणाऱ्या बसेसमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालक व शाळा व्यवस्थापनाने याची योग्य दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे काही शाळांच्या स्कूल बसेसला परिवहन विभागाची परवानगी सुद्धा नसल्याचे बोलले जाते. (शहर प्रतिनिधी)