ंगोवंश हत्येमुळे बैलांचा तुटवडा
By Admin | Updated: May 11, 2014 23:51 IST2014-05-11T23:51:55+5:302014-05-11T23:51:55+5:30
ग्रामीण भागात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेतकर्यांचे संपूर्ण जीवन गाय, बैल व म्हशीवर अवलंबून आहे. हिंदू संस्कृतीच्या प्राचीन काळापासून गाईला मातेसमान पुजल्या जाते.

ंगोवंश हत्येमुळे बैलांचा तुटवडा
ंरावणवाडी : ग्रामीण भागात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेतकर्यांचे संपूर्ण जीवन गाय, बैल व म्हशीवर अवलंबून आहे. हिंदू संस्कृतीच्या प्राचीन काळापासून गाईला मातेसमान पुजल्या जाते. मात्र या बदलत्या काळानुसार कसायाच्या अमानवीय कृत्यामुळे गोधनाची मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. त्यामुळे यावेळी बैलांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अल्पभूधारक शेतकर्यांना या कृत्याचा जबर फटका बसून बैलजोड्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. या परिस्थितीमुळे गोधनांच्या किंमतीत कमालीची वाढ झालेली आहे. परिणामी शेतकर्याला बैलजोडी खरेदी करणे कठीण झाले आहे. आजच्या काळात शेतीचे कितीही यांत्रिकीकरण झाले तरी शेतकरी व बैल यांचे नाते अतूट असून बैलाशिवाय शेतकरी शेती करुच शकत नाही. या आधुनिक युगात कितीही यंत्र-तंत्र विकसित झाले तरीही बैलजोडीचे महत्त्व कायम राहणार आहे. मागील काळापासून गोवंशाची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असल्याने शेतकर्यांना चांगल्या बैलजोडीचा सतत तुटवडा भासत आहे. बाजारात बैलांच्या किमतीत भरमसाठ वाढ होऊन बैल खरेदी शेतकर्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहे. गोवंशाची खरेदी करुन कत्तल करणार्या दलालांना ते जनावरे विकत आहे. या दलालांवर नियंत्रण नसल्याने गोवंश खरेदी करणार्यांची सक्रियता वाढली आहे. कत्तल खाण्यासाठी गोवंशाची खरेदी करणार्यांवर शासनाने कठोर कायदे न केल्यामुळे पाळीव जनावरांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. अल्पभूधारक शेतकरी १० ते १२ हजार रूपयांची बैलजोडी खरेदी करीत होता. आज मात्र त्या बैल जोडीची किमत ३० ते ४० हजारांवर पोहोचली आहे. शेतकर्यांच्या उत्पादनात घट झाल्याने शेतकरी जनावरे विकायला काढतात. याचाच फायदा घेऊन दलाल कमी किमतीत जनावरे खरेदी करून ते कत्तल खान्यात पोहोचवितात. मात्र आज परत त्यांचीच गरज भासत आहे. (वार्ताहर)