सावित्रीबाई फुले यांच्या अपेक्षांची पूर्तता मातृशक्तीने करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:44 IST2021-02-05T07:44:03+5:302021-02-05T07:44:03+5:30
नवेगावबांध : सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून जो संदेश व जे ...

सावित्रीबाई फुले यांच्या अपेक्षांची पूर्तता मातृशक्तीने करावी
नवेगावबांध : सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून जो संदेश व जे संस्कार दिले त्याला अनुसरून मातृशक्तीने संघटित व्हावे. महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. सावित्रीबाई फुले यांना महिलांकडून जे अपेक्षित होते, त्याची पूर्तता मातृशक्तीने करण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन माजी जि. प. उपाध्यक्ष रचना गहाणे यांनी केले.
येथील महिला मंडळे व बचत गट यांच्या वतीने ग्रामपंचायत परिसरात महिला मेळावा व हळदी-कुंकू कार्यक्रम शुक्रवारी घेण्यात आला. या वेळी त्या बोलत होत्या. उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य विजया कापगते यांच्या हस्ते झाले. या वेळी सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, माजी पंचायत समिती सदस्य शारदा नाकाडे, संजीव बडोले, बचत गटाच्या समन्वयक हेमलता गुप्ता, ग्राम संघाच्या अध्यक्षा भीमाबाई शहारे, आरोग्य पर्यवेक्षिका रेखा पुराम, दुर्गा मांढरे, मीना चांदेवार, नीलम अग्निहोत्री, शालिनी लांजेवार, आशा पांडे, कलाबाई डोंगरवार, भाग्यश्री कोसरकर, विमल कापगते, रेखा कांबळे, निर्मला डोंगरवार, हरकूबाई काशीवार, पोर्णिमा शहारे आदी उपस्थित होत्या. सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राला माल्यार्पण व व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतिकारी कार्यामुळे आज स्त्रिया बोलू लागल्या आहेत. बचतीचे महत्त्व लक्षात घेऊन महिलांनी खर्चाबरोबरच, बचतीची सवय स्वतःला लावून घ्यावी, असे प्रतिपादन सरपंच अनिरुद्ध शहारे यांनी केले. बचत गटाचे व्यवस्थापन व महिलांचे आर्थिक उत्थान याविषयी हेमलता गुप्ता यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य शीतल राऊत यांनी केले तर उपस्थितांचे आभार लीलाबाई सांगोळकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य अर्चना पंधरे, दुर्गाबाई मेश्राम, लताबाई आगाशे, गुणिता डोंगरवार, सविता बडोले, हर्षा बाळबुद्धे, महिला बचत गट तसेच महिला मंडळाच्या महिलांनी सहकार्य केले.