शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
3
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
4
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
5
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
6
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
7
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
8
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
9
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
10
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
11
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
12
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
13
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
14
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
15
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
16
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
17
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
18
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
19
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
20
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 

रेतीमाफीयांच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 5:00 AM

तालुक्यात चुलबंद नदी, पिपरीघाट, शशीकरण नदी, कोदामेडी, सौंदड या भागातून अवैधरित्या रेती उपसा करुन शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडविला जात आहे. रेतीमाफीया महसूल व पोलीस विभागाला न जुमानता अवैधरित्या रेती चोरुन थोड्याच दिवसात श्रीमंत झाले. श्रीमंतीमुळे ते मुजोर होवून दिवसा व रात्री बिनधास्तपणे रेती चोरुन नेत असल्याने शासकीय यंत्रणा त्रस्त झाली होती.

ठळक मुद्देडुग्गीपार पोलिसांची कारवाई : ३ रेतीमाफीया व २ दारू विक्रेत्यांच्या तडीपारचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरू असून रेती माफीया महसूल व पोलीस विभागाला न जुमानता गब्बर झाले आहेत. त्यातच अवैध दारू विक्रेत्यांचेही मनसुबे बळावले आहेत. डुग्गीपार पोलिसांनी अवैध रेतीमाफीयांच्या मुसक्या आवळल्या असून ३ रेतीमाफीया व २ दारूविक्रेत्यांना तडीपार करण्यासाठी कारवाईचा प्रस्ताव पाठविला आहे.तालुक्यात चुलबंद नदी, पिपरीघाट, शशीकरण नदी, कोदामेडी, सौंदड या भागातून अवैधरित्या रेती उपसा करुन शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडविला जात आहे. रेतीमाफीया महसूल व पोलीस विभागाला न जुमानता अवैधरित्या रेती चोरुन थोड्याच दिवसात श्रीमंत झाले. श्रीमंतीमुळे ते मुजोर होवून दिवसा व रात्री बिनधास्तपणे रेती चोरुन नेत असल्याने शासकीय यंत्रणा त्रस्त झाली होती. रेतीमाफीयांचे एकमेकांशी कनेक्शन पाहता पोलीस किंवा महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांच्यावर वॉच ठेवून त्वरीत एकमेकांना माहिती पुरवून ते गायब होत होते. त्यामुळे लोकांचा महसूल विभाग व पोलीस विभागावरचा विश्वास डळमळीत झालेला होता.डुग्गीपारचे ठाणेदार विजय पवार यांनी मात्र सर्व रेतीमाफीयांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात कुंडली काढून त्यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती घेत वर्गीकरण केले. त्यानुसार चालू वर्षात वाळूचोरीचे २३ गुन्हे दाखल झाल्यावर रेती चोरांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरु केले. सुरुवातीला २ पेक्षा जास्त रेती चोरीच्या गुन्हेगारांविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ११० प्रमाणे प्रतिबंधक कारवाया केल्या.सदर कारवाई होऊनही ज्या रेतीमाफीयांनी आपला अवैध धंदा सुरुच ठेवला अशा ३ रेतीमाफीयांवर शासनाच्या मालमत्तेचे रक्षण व्हावे व सार्वजनिक शांतता कायम राहावी म्हणून तडीपारीचे प्रस्ताव पोलीस अधीक्षकांमार्फत उपविभागीय अधिकाऱ्यांना पाठविले आहे. त्यामुळे रेतीमाफीयांचे धाबे दणाणले असून ते धास्तावलेले आहेत.तसेच अवैधरित्या देशी व विदेशी दारु विक्री करणाऱ्यामुळे सामाजिक वातावरण दूषित होवून सार्वजनिक शांतता भंग होत आहे. यामुळे जनसामान्यांना विनाकारण त्रास सोसावा लागत असल्यामुळे त्यांच्यावरही कठोर प्रतिबंध व्हावा म्हणून २ अवैधरित्या दारु विकणाºया इसमांविरुद्ध सुद्धा तडीपारचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. डुग्गीपार पोलीस स्टेशनच्या या ५ तडिपार कारवाईमुळे वाळूमाफीया व अवैधरित्या दारु विक्रेत्यांचा प्रतिबंध होईल. मात्र पोलिसांनी या कारवाईत सातत्याने ठेवण्याची गरज असल्याचे नागरिक बोलत आहे.

टॅग्स :sandवाळू