समता सैनिक दल शाखेचा वर्धापन दिवस साजरा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:15 IST2021-01-13T05:15:14+5:302021-01-13T05:15:14+5:30
अध्यक्षस्थानी प्रा. अश्विन लांजेवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगर बौद्ध समाजाचे अध्यक्ष रेवचंद शहारे, शाखा प्रमुख भीमाबाई शहारे, मुंगली ...

समता सैनिक दल शाखेचा वर्धापन दिवस साजरा ()
अध्यक्षस्थानी प्रा. अश्विन लांजेवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगर बौद्ध समाजाचे अध्यक्ष रेवचंद शहारे, शाखा प्रमुख भीमाबाई शहारे, मुंगली शाखा प्रमुख वैशाली राऊत, भास्कर बडोले, डाकराम सांगोलकर, तिलकचंद बडोले, ग्रामपंचायत सदस्य लीला सांगोळकर, दुर्योधन राऊत, फरिदा तिरपुडे, सीमा बडोले, हर्षा डोंगरे उपस्थित होते. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या छायाचित्राला दीप प्रज्वलित व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. दलाच्या ध्वजाचे ध्वजारोहण शाखा प्रमुख भीमाबाई शहारे यांच्या हस्ते करण्यात आले. वेळी समता सैनिक दलाची स्थापना व त्याचा प्रसार व बाबासाहेबांचा त्याच्या स्थापनेमागील उद्देश यावर पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मांडून संचालन समता सैनिक दलाचे अर्जुनी-मोरगाव तालुका जनसंपर्क अधिकारी हेमचंद लाडे यांनी केले. कार्यक्रमासाठी सुगंधा राऊत, पौर्णिमा शहारे, ऊर्मिला राऊत, सुनीता सहारे, वनिता राऊत, शेवंता टेंभुर्णे, जगदीश शहारे यांनी परिश्रम केले. कार्यक्रमाला समता सैनिक दल शाखा नवेगावबांध व मुंगली येथील सैनिक उपस्थित होते.