गुजरातच्या धरतीवर सालेकसातील मुलींनी गाजविले मैदान ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:29 IST2021-07-29T04:29:09+5:302021-07-29T04:29:09+5:30

सालेकसा : सालेकसासारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातून तायक्वांदोसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळात ४ मुलींनी उंच भरारी घेत सुवर्णपदक पटकाविले. गुजरात ...

Saleksa girls win ground on Gujarat soil () | गुजरातच्या धरतीवर सालेकसातील मुलींनी गाजविले मैदान ()

गुजरातच्या धरतीवर सालेकसातील मुलींनी गाजविले मैदान ()

सालेकसा : सालेकसासारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातून तायक्वांदोसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळात ४ मुलींनी उंच भरारी घेत सुवर्णपदक पटकाविले. गुजरात येथील जामनगर येथे आयोजित ४ थे राष्ट्रीय युवा खेळ स्पर्धेत सहभागी होऊन सालेकसा येथील मुलींनी तायक्वांदो या खेळात सुवर्णपदक मिळविले. गोल्डी भाटिया यांच्या नेतृत्वाखाली सालेकसा येथील ४ विद्यार्थिनींनी ३ दिवसीय राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत चार सुवर्णपदके पटाकाविली. रिया अहिरकर, प्राची प्रधान, साक्षी शिवणकर, विद्या नागपुरे असे सुवर्णपदके प्राप्त करणाऱ्या मुलींची नाव आहेत. ग्रामीण भागातही चांगले खेळाडू आहेत. केवळ त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचे मार्गदर्शक शिक्षक गोल्डी भाटिया यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक प्रमोद बघेले, तहसीलदार कांबळे यांनीही या मुलींचे कौतुक केले आहे. मुलींनी त्यांच्या यशाचे श्रेय त्यांचे शिक्षक गोल्डी भाटिया, दुलीचंद मेश्राम, नरेश बोहरे व त्यांच्या पालकांना दिले आहे.

Web Title: Saleksa girls win ground on Gujarat soil ()